AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असेल, तर मातोश्रीवर दिवाळी बघू : रवी राणा

महाराष्ट्रात मुख्यमंत्री तुपाशी आणि शेतकरी उपाशी आहे," अशी टीकाही रवी राणा यांनी केली. (MLA Ravi Rana Criticism CM Uddhav Thackeray)

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असेल, तर मातोश्रीवर दिवाळी बघू : रवी राणा
| Updated on: Oct 20, 2020 | 6:45 PM
Share

अमरावती : परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील परिस्थितीचीही पाहणी करावी. त्या ठिकाणी परिस्थिती वाईट आहे. विदर्भासोबत दुजाभाव करु नये, असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असेल तर आम्ही मातोश्रीवर जाऊन दिवाळी बघू, असेही रवी राणा यावेळी म्हणाले. (MLA Ravi Rana Criticism CM Uddhav Thackeray)

“परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीवर बसून आहेत. काल मुख्यमंत्र्यांनी मातोश्री बाहेर पडून सोलापूरचा दौरा केला. हा दौरा 2 तासात पूर्ण करून मुख्यमंत्री मातोश्रीवर परतले. खरंतर मुख्यमंत्र्यांनी दुजाभाव करु नये, संपूर्ण महाराष्ट्र तुमचा आहे,” असा टोलाही रवी राणा यांनी लगावला.

“विदर्भातील परिस्थिती ही फार वाईट आहे. त्यांचीही सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी करावी. विदर्भासोबत दुजाभाव करू नका. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्याला मदतीची गरज आहे. त्यामुळे आघाडी सरकारकडून त्याला अपेक्षा आहे,” असेही रवी राणा म्हणाले.

“शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असेल तर आम्ही मातोश्रीवर जाऊन दिवाळी बघू. महाराष्ट्रात मुख्यमंत्री तुपाशी आणि शेतकरी उपाशी आहे,” अशी टीकाही रवी राणा यांनी केली.

शिवसेनेकडून राणा दाम्पत्याचा निषेध

गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे विविध कारणावरुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टार्गेट करत आहेत. त्यांच्यावर सातत्याने टीका करत आरोप करताना दिसत आहे. यावरुन अमरावतीतील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

अमरावतीच्या राजकमल चौकात नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेने आक्रमक घोषणाबाजी केली. त्यावेळी शिवसेनेकडून राणा दाम्पत्याचा निषेध केला. तसेच नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या पोस्टरला जोडे चपला मारण्यात आल्या. तसेच आता यापुढे नवनीत राणा यांनी बेताल वक्तव्य आणि टीका केल्यास शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देऊ, असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे. (MLA Ravi Rana Criticism CM Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या : 

संभाजीराजेंनी OBC कोट्यातून मराठा आरक्षणाचा अभ्यास करु नये, नापास होतील : प्रकाश शेंडगे

शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ, प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.