AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे मंत्रिमंडळ विस्तारात ‘हे’ चेहरे गायब

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, शेकापचे विधानपरिषदेवरील आमदार जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही.

ठाकरे मंत्रिमंडळ विस्तारात 'हे' चेहरे गायब
| Updated on: Dec 30, 2019 | 12:09 PM
Share

मुंबई : ठाकरे मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 13, तर काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या शेकाप आणि समाजवादी पक्षाला स्थान नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर फडणवीस सरकारमधील शिवसेनेचे दिग्गज नेतेही गायब (MLAs not in Thackeray Ministry) आहेत.

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, शेकापचे विधानपरिषदेवरील आमदार जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. शिवसेनेकडून पाठिंबा देणाऱ्या तिघा आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. परंतु काँग्रेस राष्ट्रवादीकडून मित्रपक्षांची नावं पुढे करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे शेकाप आमदार जयंत पाटील यांनी तर आपल्याला शपथविधीचं आमंत्रणही नसल्याचं ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं.

दुसरीकडे, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. राष्ट्रवादीकडून रोहित पवार यांचंही नाव नसल्याने भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेनेने मुंबई, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच विभागांची सांगड घालत मंत्र्यांची यादी तयार केल्याचं दिसत आहे. मात्र रवींद्र वायकर, दीपक केसरकर, दिवाकर रावते, रामदास कदम, दीपक सावंत, तानाजी सावंत या फडणवीस सरकारमधील मंत्र्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचं पाहायला मिळत आहे.

संजय राऊत यांचे बंधू आणि विक्रोळीचे आमदार सुनिल राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे राऊतही नाराज (MLAs not in Thackeray Ministry) असल्याचं म्हटलं जात आहे.

भाजपचा बहिष्कार

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी सोहळ्यावर भाजप बहिष्कार टाकणार आहे. एकीकडे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली नाही, शेतकरी अडचणीत असताना मात्र शपथ सोहळा थाटामाटात होत आहे, असा आरोप करत भाजपने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

शिवसेनेचे संभाव्य मंत्री कोण?

अॅड अनिल परब – मुंबई (विधानपरिषद) उदय सामंत – रत्नागिरी (रत्नागिरी) – कोकण संजय राठोड – दिग्रस (यवतमाळ) – विदर्भ गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण (जळगाव) – उत्तर महाराष्ट्र दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक) – उत्तर महाराष्ट्र अब्दुल सत्तार – सिल्लोड (औरंगाबाद) – मराठवाडा डॉ. संदीपान भुमरे – पैठण (औरंगाबाद) – मराठवाडा शंभूराजे देसाई – पाटण (सातारा) – पश्चिम महाराष्ट्र

शिवसेनेला पाठिंबा दिलेले आमदार

बच्चू कडू (प्रहार जनशक्ती) – अचलपूर (अमरावती) शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) – नेवासा (अहमदनगर) राजेंद्र पाटील यड्रावकर – शिरोळ (कोल्हापूर)

आतापर्यंत सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

काँग्रेसमधून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी 

अशोक चव्हाण (कॅबिनेट मंत्री) – भोकर (नांदेड) के सी पाडवी (कॅबिनेट मंत्री) – अक्कलकुवा (नंदुरबार) विजय वडेट्टीवार (कॅबिनेट मंत्री) – ब्रह्मपुरी (चंद्रपूर) अमित देशमुख (कॅबिनेट मंत्री) – लातूर शहर (लातूर) सुनिल केदार (कॅबिनेट मंत्री) – सावनेर (नागपूर) यशोमती ठाकूर (कॅबिनेट मंत्री) – तिवसा (अमरावती) वर्षा गायकवाड (कॅबिनेट मंत्री) – धारावी (मुंबई) अस्लम शेख (कॅबिनेट मंत्री) – मालाड पश्चिम (मुंबई)

सतेज पाटील (राज्यमंत्री) – कोल्हापूर (विधानपरिषद) डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री) – पलुस कडेगाव (सांगली)

आतापर्यंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री कोण?

अजित पवार – बारामती (पुणे) दिलीप वळसे पाटील – आंबेगाव (पुणे) धनंजय मुंडे – परळी (बीड) नवाब मलिक – अणूशक्तिनगर (मुंबई) जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा (ठाणे) अदिती तटकरे – श्रीवर्धन (रायगड) हसन मुश्रीफ – कागल (कोल्हापूर) अनिल देशमुख – काटोल (नागपूर) प्राजक्त तनपुरे – राहुरी (अहमदनगर) संजय बनसोडे – उदगीर (लातूर) राजेश टोपे – घनसावंगी (जालना) राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा (बुलडाणा) दत्तात्रण भरणे – इंदापूर (पुणे)

आतापर्यंत जयंत पाटील आणि छगन भुजबळ या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

ठाकरे सरकार

सध्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकूण 7 मंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत अशा सात मंत्र्यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी, म्हणजेच 12 डिसेंबरला तात्पुरते खातेवाटप करण्यात आले होते.

MLAs not in Thackeray Ministry

संबंधित बातम्या :

अजित पवार, आव्हाड, धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री कोण?

अनिल परब, गुलाबराव पाटील निश्चित, शिवसेनेच्या 13 मंत्र्यांची यादी

ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार : काँग्रेसच्या दहा मंत्र्यांची अधिकृत यादी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.