मनसे आणि भाजप युती शक्य, संघाच्या माजी प्रवक्त्यांचं मोठे विधान

राज्यातील राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता (RSS Former spokesperson comment on MNS-BJP alliance) आहे.

मनसे आणि भाजप युती शक्य, संघाच्या माजी प्रवक्त्यांचं मोठे विधान
Follow us
| Updated on: Jan 11, 2020 | 1:25 PM

नागपूर : राज्यातील राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता (RSS Former spokesperson comment on MNS-BJP alliance) आहे. मंगळवारी (7 जानेवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजप-मनसेच्या युतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी मोठे विधान केले आहे. “जर मनसेला संघांचे हिंदूत्व मान्य असेल. तर ते भाजपसोबत येतील,” अशी प्रतिक्रिया मा. गो. वैद्य यांनी दिली.

“मनसेला संघाचं हिंदूत्व मान्य असेल. तर ते भाजपसोबत येईल. मनसे आणि भाजप यांच्या विचारांपेक्षाही ते त्या व्यक्तिंवर अवलंबून आहे. कारण जर त्यांना भाजपची भूमिका स्विकृत असेल, व्यापक हिंदूत्वाची संघाची भूमिका मान्य असेल तर मनसे भाजपसोबत येईल,” अशी प्रतिक्रिया मा. गो. वैद्य यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारसोबतच सर्वच राज्यांना सुधारित नागरिकत्व कायदा लागू करावा लागेल असेही मां.गो वैद्य  (RSS Former spokesperson comment on MNS-BJP alliance) म्हणाले.

“राज्याची पूनर्रचना आवश्यक आहे. ज्यात विदर्भ वेगळा होईल. कोणत्या राज्याची लोकसंख्या ही 3 कोटींच्या वर नको आणि एक कोटींपेक्षा कमी नको. हे यापूर्वी अनेकांनी सांगितले. म्हणूनच गोवा महाराष्ट्रापासून वेगळे आहे. जर महाराष्ट्राची 11 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असेल, तर राज्याचे 3 किंवा चार भाग होतील. तसेच छोट्या राज्यासाठी केंद्र सरकारनं प्रांत रचना आयोग नेमावा,” अशीही मागणी संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी केली आहे.

मनसेचे महाअधिवेशन

शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने, मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेल्या काही दिवसापासून तशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहेत. मनसेचं येत्या 23 जानेवारीला महाअधिवेशन होणार आहे. मनसेच्या कारकिर्दीतील हे पहिलं अधिवेशन आहे. या अधिवेशनात राज ठाकरे कोणती भूमिका जाहीर करणार याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलं आहे.

फडणवीस-राज ठाकरे भेट

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मंगळवारी 7 जानेवारीला गुप्त भेट झाली होती. प्रभादेवी येथील हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली होती. महत्त्वाचं म्हणजे या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे पुढील दाराने, तर राज ठाकरे मागील दाराने बाहेर पडले. ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यात ही दृश्यं कैद झाली होती.

या बैठकीसाठी अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मित्र गुरुप्रसाद रेगे हे या बैठकीला उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे या बैठकीसाठी कोणत्याही सुरक्षा रक्षकाशिवाय आले होते. तर देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकीबाबत मोठी गोपनीयता बाळगली होती. या भेटीनंतर गुरुप्रसाद रेगे देवेंद्र फडणवीस यांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी खाली आले (RSS Former spokesperson comment on MNS-BJP alliance) होते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.