Raj-Fadnavis Meet : ‘राजकरण हा धंदा झालाय, ज्याच्याकडून…’, राज-फडणवीस भेटीवर मोठ्या राजकीय पंडिताची परखड प्रतिक्रिया VIDEO
Raj-Fadnavis Meet : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत ताज लँड एन्ड हॉटेलमध्ये भेट झाली. त्यावर एका मोठ्या राजकीय पंडिताने परखड भाष्य केलं आहे. राजकारण धंदा झाल्याच त्याने सांगितलं.

आज महाराष्ट्राच्या राजकाणात एक मोठी घडामोड घडली. ठाकरे बंधुंच्या संभाव्य युतीची चर्चा सुरु असताना आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वांद्रयाच्या ताज लँड एन्ड हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. “हे प्रेशर टॅकटिक्स आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणा मजा किती आहे बघा, राज ठाकरेंकडे काय आहे? ना आमदार, ना खासदार. पण राज ठाकरे असा एक वेटेज झालाय शिवसेना, उद्धव ठाकरे आणि भाजप तिघे पणे इंटरेस्टेड आहेत” असं मत राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी व्यक्त केलं.
“राज ठाकरे फक्त न्यूजमध्ये आहेत. विश्वसनीयता महाराष्ट्राच्या राजकारणात कुठे राहिली आहे? कोण कोणासोबत कधी जाईल, कोण कधी कोणाच्या पाठित खंजीर खुपसेल आता या गोष्टी ब्रेकिंग न्यूज राहिलेल्या नाहीत. नैतिकता, विचारधारा या दोन्ही गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात संपलेल्या आहेत. फक्त सत्तेच राजकारण आणि सत्तेची बेरीज सुरु आहे” असं अशोक वानखेडे म्हणाले.
‘गोरगरीब, शेतकरी, अंतिम माणूस हे सगळं भाषणात’
“राज ठाकरे पाहतील, चांगलं डील कोणाकडून मिळतय, भाजप की उद्धव ठाकरे?. ज्यांच्याकडून चांगल डील मिळेल, त्यांच्यासोबत ते डील करतील. राजकरण हा धंदा झालेला आहेत. गोरगरीब, शेतकरी, अंतिम माणसापर्यंत हे सगळं भाषणात असतं” अशा परखड शब्दात अशोक वानखेडे यांनी आपलं मत व्यक्त केलं. ‘बघा, उद्या राज ठाकरे या भेटीवर बोलतील…’
“प्रत्येकाला आपल्या पदरात जास्त पाडून घ्यायचं आहे. आपलं महत्त्व वाढलेलं आहे, ते महत्त्व कॅच करण्यासाठी या निरंतर भेटी होत राहतील. 14 तारखेला राज ठाकरे, आदित्य यांचा वाढदिवस आहे. दोघांचे बॅनरवर एकत्र फोटो लागलेले आहेत. उद्या राज ठाकरे या भेटीवर बोलतील, महाराष्ट्रातल्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो” असं विश्लेषण अशोक वानखेडे यांनी केलं.
