मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं झालं…? मनसेकडून उद्धव ठाकरेंना अनोख्या शुभेच्छा

Namrata Patil

|

Updated on: Jan 01, 2021 | 4:25 PM

"#मुख्यमंत्री वाढीव वीज बिलाचं काय झालं?" असेही यात नमूद करण्यात आलं आहे. (MNS Banner On Lockdown Electricity Bill) 

मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं झालं...? मनसेकडून उद्धव ठाकरेंना अनोख्या शुभेच्छा
Follow us

मुंबई : राज्यात वाढीव वीजबिलाचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. नववर्षाच्या पहिल्या दिवशी मनसेने वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन आक्रमक पावित्रा धारण केला आहे. मुख्यमंत्री वाढीव वीज बिलाचं काय झालं?, असा सवाल मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यांना केला आहे. या आशयाचे एक बॅनरही मनसेने मातोश्रीबाहेर लावले आहे. या बॅनरमधून मनसेने उद्धव ठाकरेंना नववर्षाच्या शुभेच्छा देत, त्यांना वीजबिलाच्या आश्वासनाचीही आठवण करुन दिली आहे. (MNS Banner On Lockdown Electricity Bill)

“मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता नवीन वर्ष आलं. गोड बातमी तर राहिली दूर पण जनतेचे हालचं हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही तरी वीज बिल भरा, ऊर्जा मंत्री म्हणाले. मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं झालं…?” असा सवाल मनसेने या बॅनरमधून विचारला आहे.

“#मुख्यमंत्री वाढीव वीज बिलाचं काय झालं?” असेही यात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांना मनसेकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर दुसरीकडे मात्र मागील वर्षात जनतेला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.

वाढीव वीजबिलावरुन मनसेचा झटका मोर्चा

दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीजबिल माफ करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यानंतर मनसेने दादर आणि माहीम परिसरात होर्डिंगबाजी करून राज्य सरकारविरोधात वातावरण निर्मिती केली होती. ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, आणि ‘तीन तिघाडा, लाईट बिघाडा’, अशा घोषणा या होर्डिंगवर लिहून सरकारवर निशाणा साधण्यात आला होता. शिवाय सोमवारी भेटूच, शॉकसाठी तयार राहा, असा इशाराही मनसेने उद्धव ठाकरेंना दिला होता.

भरमसाठ वीजबिल प्रकरणी मनसेने राज्यभर ‘झटका मोर्चा’चं आयोजन केलं होतं. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. मात्र, अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली होती.

“राज्यातील जनतेला वाढीव बिलाचा शॉक बसल्यानंतर मनसेचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांना भेटलं होतं. त्याशिवाय ऊर्जा सचिव, बीएमसी अधिकाऱ्यांना भेटले. अदाणी ग्रुपचे अधिकारी राज ठाकरेंना भेटले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: राज्यपालांना भेटले. राज्यपालांनी त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना भेटण्यास सांगितलं. त्यानंतर राज ठाकरे हे शरद पवारांशी बोलले. पवारांनी राज ठाकरेंकडून निवेदनं मागवली. आम्ही ही निवेदनं दिली. तरीही त्यावर निर्णय घेतला गेला नाही. आता तर वीजबिल माफ करणार नसल्याचं ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. (MNS Banner On Lockdown Electricity Bill)

संबंधित बातम्या : 

राज ठाकरेंच्या वीजबिल माफीच्या आंदोलनात भाजपही; बावनकुळेंचं मोठं विधान

मनसेच्या मोर्चाला मुंबई पोलिसांचा नकार, पण मोर्चा काढण्यावर कार्यकर्ते ठाम

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI