Shivsena | युवराजांना लवकरच शिल्लकसेनेसाठी यात्रा काढावी लागणार, मनसे नेते गजानन काळेंचा टोमणा

मनसे नेते गजाजन काळे यांनी शिवसेनेला शिल्लकसेना असे म्हणत ट्विटरवरून हिणवलं आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा सुरु केल्यापासून त्याचे उलट परिणाम दिसू लागलेत, असाही टोमणा मारला आहे.

Shivsena | युवराजांना लवकरच शिल्लकसेनेसाठी यात्रा काढावी लागणार, मनसे नेते गजानन काळेंचा टोमणा
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 10:28 AM

मुंबईः छोटे नवाब यांनी काढलेल्या निष्ठा यात्रेचे उलट परिणाम दिसू लागलेत. त्यामुळे त्यांना आता शिल्लकयात्रा काढावी लागणार असं दिसतंय. मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना हा टोमणा मारला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जिल्हा, शहर आणि ग्रामीण भागातील शिवसेना (Shivsena) पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेतून बाहेर पडत आहेत. शिंदेंच्या गटातील संख्याबळ सर्वच स्तरांतून वाढत आहे. शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी ठिकठिकाणी शिवसेनेचे मेळावे आयोजित केले. शिवसैनिकांसाठी निष्ठा यात्रेचंही आयोजन करण्यात आलं आहे. मात्र याचे उलट परिणाम दिसत असल्याचा आरोप गजानन काळे यांनी केला आहे.

#शिल्लकसेना असे ट्विट

आमदार, नगरसेवक यांनी साथ सोडल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते आणि जिल्हाध्यक्षपण मनसे नेते गजाजन काळे यांनी शिवसेनेला शिल्लकसेना असे म्हणत ट्विटरवरून हिणवलं आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा सुरु केल्यापासून त्याचे उलट परिणाम दिसू लागलेत.यांचा पक्ष सोडू लागलेत. आता युवराजांना लवकरच शिल्लक यात्रा काळावी लागणार असं दिसतंय, असं ट्विट गजाजन काळे यांनी केलंय.

शिंदेंचा मध्यरात्री मेळावा

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मध्यरात्री दीड वाजता शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित केलं. औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी शेकडो शिवसैनिकांसह गुरुवारी मध्यरात्री मुंबईत दाखल झाले. शिरसाट यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री दीड वाजता संबोधित केलं. शिवसेनेच्या इतिहासात एवढ्या रात्री सभा कधीही झाली नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी संयज राऊतांवर आरोप केले. शिवसेना संपवायची सुपारी नेमकी कुणी घेतली हे तपासा. आम्ही गद्दारी नाही तर उठाव केला. शिवसेना आणि शिवसैनिकाला वाचवण्यासाठी आम्ही क्रांती केली असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.