पेट्रोल-डिझेलवर वाढीव कर नको, सिगरेट-तंबाखूवर 'कोरोना सेस' आकारा : बाळा नांदगावकर

सरकारने सिगरेट आणि तंबाखूजन्य गोष्टींवर "कोरोना सेस" लावून ही महसुली तूट भरुन काढावी, असे ट्वीट बाळा नांदगावकर यांनी केले आहे. (MNS Bala Nandgaonkar Request to charge Corona Cess on Tobacco Cigarette)

पेट्रोल-डिझेलवर वाढीव कर नको, सिगरेट-तंबाखूवर 'कोरोना सेस' आकारा : बाळा नांदगावकर

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनावर कर लावण्याऐवजी सिगरेट आणि तंबाखूजन्य पदार्थांवर “कोरोना सेस” लावून महसुली तूट भरुन काढावी, अशी विनंती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. (MNS Bala Nandgaonkar Request to charge Corona Cess on Tobacco Cigarette)

“सध्या कोरोना महामारीमुळे सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात घटला आहे. सरकार त्याची भरपाई ही वारंवार पेट्रोल आणि डिझेलवर कर वाढवून करत आहे, परंतु त्याऐवजी सरकारने सिगरेट आणि तंबाखूजन्य गोष्टींवर “कोरोना सेस” लावून ही महसुली तूट भरुन काढावी आणि पेट्रोल व डिझेलवर नवनवीन कर लादणे तात्काळ थांबवावे, अशी आमच्या वतीने सरकारला विनंती आहे” असे ट्वीट बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

इंधनाचे दर वाढल्याने वाहनचालकांना आर्थिक झळ बसत आहे. शुक्रवारच्या तुलनेत आज (शनिवार 13 जून) पेट्रोलच्या दरात 63 पैसे, तर डिझेलच्या दरात 60 पैसे दरवाढ झाली. त्यामुळे पुण्यात पेट्रोलचा दर 81.93 रुपये प्रतिलिटर, तर डिझेलचा दर 70.80 रुपये प्रतिलिटरवर गेला आहे.

(MNS Bala Nandgaonkar Request to charge Corona Cess on Tobacco Cigarette)

याआधीही बाळा नांदगावकर यांनी इंधन दरवाढीवरुन राज्य सरकारला फटकारले होते. “महसूल तूट भरुन काढण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच पेट्रोल आणि डिझेलवर 2 रुपये मूल्यवर्धित कर (VAT) वाढवला , सरकारने या ऐवजी मद्यावरील कर वाढवावा हे मार्च महिन्यापासून सुचवत आहोत. कारण आधीच आपल्या राज्यात इंधनाचे दर इतर अनेक राज्यांपेक्षा जास्त आहेत व त्यात हा अधिभार” असे ट्वीट नांदगावकरांनी 8 जूनला केले होते.

हेही वाचा : महसुलासाठी वाईन शॉप्स सुरु करा, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“अजूनही सरकारने पेट्रोल व डिझेल वरील VAT मध्ये केलेली 2 रुपयांची वाढ मागे घ्यावी आणि मद्यावरील कर वाढवून महसुली तूट भरुन काढावी, कारण मद्य हे नक्कीच जीवनावश्यक नव्हे परंतु इंधन हे जीवनावश्यक आहे” असेही ते म्हणाले होते.

(MNS Bala Nandgaonkar Request to charge Corona Cess on Tobacco Cigarette)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *