नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच का? मनसे आमदार राजू पाटील भडकले

कल्याण डोंबिवलीत सध्या पुलावरुन चांगलंच राजकारण तापताना दिसत आहे (MNS MLA Raju Patil ask questions to KDMC over Vadavali bridge opening program)

नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच का? मनसे आमदार राजू पाटील भडकले
राजू पाटील, आमदार, मनसे

कल्याण (ठाणे) : कल्याण डोंबिवलीत सध्या पुलावरुन चांगलंच राजकारण तापताना दिसत आहे. आधी पत्रीपूल, नंतर कोपरपूल आता वडवली रेल्वे उड्डाण पूलावरुन मनसे-शिवसेनेत जुंपलेली बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे हा पूल चक्का अकरा वर्षांनी तयार झाला. आता या पुलाच्या लोकार्पणावरुन प्रचंड राजकारण तापलं आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती या पुलाचं लोकार्पण होणार होतं. मात्र, काही कारणास्तव लोकार्पण रद्द करण्यात आलं. मात्र, मनसे आमदार राजू पाटील यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना घेऊन या पुलाचं लोकार्पण केलं होतं. त्यानंतर प्रशासनाकडून मध्यरात्री पुन्हा तो पूल बंद करण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी (27 मार्च) अधिकृतणे या पुलाचं लोकार्पण होणार आहे. मात्र, याच मुद्द्यावरुन मनसे आमदार राजू पाटलांनी निशाणा साधला (MNS MLA Raju Patil ask questions to KDMC over Vadavali bridge opening program).

आमदार राजू पाटील नेमकं काय म्हणाले?

कल्याण डोंबिवली महापालिकेने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेने सामान्य नागरीकांवर विविध निर्बंध घातले आहेत. मात्र नियम फक्त सामन्यांसाठीच का? असा प्रश्न राजू पाटील यांनी उपस्थित केला. वडवली रेल्वे उड्डाण पूलाचे लोकार्पण उद्या सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. हा सार्वजनिक कार्यक्रम आहे. नागरीकांना बंदी घातली जात असताना सार्वजनिक कार्यक्रमांना कशाच्या आधारे परवानगी दिली गेली? पालिकेसाठी वेगळे नियम आहेत का? असा सवाल आमदार पाटील यांनी केला.

11 वर्षे रखडलेल्या वडवली पूलाचे चांगल्या वाईटाचे श्रेय सत्ताधारी शिवसेनेचे आहे. मग कोरोना काळात लोकार्पणाचा अट्टहास कशासाठी? असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला आहे. राजू पाटील यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांनी ट्विटरवर केडीएमसी कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांना ट्विट टॅग करत प्रश्न उपस्थित केले आहेत (MNS MLA Raju Patil ask questions to KDMC over Vadavali bridge opening program).

हेही वाचा : मनसे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा; शिवसेना आमदाराची खोचक टीका