मनसेच्या एकमेव आमदाराला खुद्द राज ठाकरेंकडून खुर्चीची ऑफर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव नवनिर्वाचित आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil meet Raj Thackeray) यांनी कल्याण ग्रामीणमधून विजय मिळवला.

मनसेच्या एकमेव आमदाराला खुद्द राज ठाकरेंकडून खुर्चीची ऑफर

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव नवनिर्वाचित आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil meet Raj Thackeray) यांनी कल्याण ग्रामीणमधून विजय मिळवला. यानंतर आज (25 ऑक्टोबर) त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या घरी कृष्णकुंजवर भेट घेतली. राज ठाकरे यांनी स्वतः राजू पाटील यांचं (MNS MLA Raju Patil meet Raj Thackeray) स्वागत करत त्यांचं अभिनंदन केलं. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी मनसेचे आमदार राजु पाटील यांना आपली स्वतःची खुर्ची देऊ केली. मात्र, राजू पाटील यांनी आदराने त्या खुर्चीवर बसण्यास नकार दिला.


यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी राजू पाटील यांचं औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे यांनी औक्षण करण्यासाठी राजू पाटील यांना आपल्या खुर्चीवर बसण्यास सांगितलं. राज ठाकरेंनी पाटील यांचा हात धरुन ओवाळायचं आहे दोन मिनिट बस. माझी खुर्ची घेऊ नको पण येथे बस असं सांगितलं. मात्र, राजू पाटील यांना त्यांच्या खुर्चीवर बसण्यास संकोच झाला. अखेर शर्मिला ठाकरे यांनीच मध्यस्थी करत ते तुमच्या खुर्चीवर नाही बसणार असं म्हणत राजू पाटील यांना राज ठाकरेंच्या खुर्ची शेजारी बसवून ओवाळलं.

मनसेचे सर्वच उमेदवार आज राज ठाकरे यांच्या भेटीला आले होते. त्यांचंही शर्मिला ठाकरे यांनी औक्षण करत स्वागत केलं. राज ठाकरे यांनी पुढील वाटचालीविषयी देखील मार्गदर्शन केल्याचं राजू पाटील यांनी सांगितलं. राजू पाटील म्हणाले, “जेव्हा आम्ही एका पक्षाचे प्रतिनिधी म्हणून जातो तेव्हा आम्हाला भूमिका मांडताना आमचा विचार आणि व्हिजन घेऊन जावं लागणार आहे. राज ठाकरे यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र व्हावा म्हणून मी वेळोवेळी सभागृहात प्रश्न मांडेन.”


राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे यापुढील काळात तेच मनसेची सरकारविरोधी भूमिका विधिमंडळात मांडणार आहेत. त्यांना 86233 मते मिळाली. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे रमेश म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. म्हात्रे यांनी राजू पाटील यांना कडवी झूंज दिली. रमेश म्हात्रे यांना 80665 मते मिळाली आहेत.

मनसेने इतर पक्षांच्या तुलनेत काहीशी उशिराने विधानसभा निवडणुकीत उडी घेतली. सुरुवातीला मनसे निवडणूक लढणार की नाही याबद्दल संभ्रम होता. मात्र, त्यानंतर स्वतः राज ठाकरे यांनी समोर येत भूमिका स्पष्ट केली आणि निवडणूक लढण्याची घोषणा केली. राज ठाकरेंनी राज्यभरात मोजक्या ठिकाणी सभा घेत मनसेला राज्यातील सक्षम विरोधीपक्ष बनण्यासाठी जनमत मागितले. मात्र, या निकालात त्यांना केवळ कल्याण ग्रामीण मतदारसंघातच यश आलं आहे.

मनसेने या विधानसभा निवडणुकीत एकूण 110 उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवलं होतं. त्यापैकी मनसेला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. मात्र, किती उमेदवार लढणार याची आकडेवारी सांगितली नाही. दररोज चार-पाच उमेदवारांची नावं जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी 110 उमेदवारांची नावं जाहीर केली.

राज ठाकरेंनी 2006 मध्ये शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली होती. तेव्हापासून राज ठाकरेंच्या राजकीय वाटचालीत अनेक चढउतार पाहायला मिळाले. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात 2009 मधील विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. 2014 मध्ये मनसेचा केवळ 1 आमदार निवडून आला.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI