‘…तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही’, मनसेच्या आमदाराचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेले भूस्खलन रोखण्यासाठी आमदार राजू पाटील यांनी 5 लाखांची मदत केली (MNS MLA Raju Patil on fort development).

'...तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही', मनसेच्या आमदाराचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
Follow us
| Updated on: Sep 11, 2020 | 4:32 PM

डोंबिवली : प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेले भूस्खलन रोखण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानकडून निधी संकलन सुरु आहे. या निधी संकलनाची माहिती मिळताच आमदार राजू पाटील यांनी 5 लाखांची मदत केली (MNS MLA Raju Patil on fort development). छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड-किल्ले ढासळत असताना सरकार आणि पुरातत्व खात्याचे त्याकडे लक्ष नसल्याचा आरोप होत आहे. असं असलं तरी अनेक सामाजिक संस्था आणि संघटना ते वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

“सत्ताधारी शिवाजी महाराजांचे नाव सांगून सत्ता भोगत आहेत. मात्र, गड-किल्ल्याकडे त्याचे अजिबात लक्ष नाही. गड-किल्ल्याकडे दुर्लक्ष करत महत्वाच्या नसलेल्या गोष्टींना सरकारकडून जाणीवपूर्वक महत्व दिले जात असल्याचा आरोप आमदार राजू पाटील यांनी केला. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या गड-किल्ल्यांची देखरेख करण्यासाठी राज्य सरकारने एखादे स्वतंत्र मंडळ तयार करावे”, अशी मागणी आपण राज्य शासनाकडे करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

राजू पाटील म्हणाले, “छत्रपतींच्या नावाने केवळ राजकारणच होणार असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. अरबी समुद्रात शिवस्मारक उभं राहील तेव्हा राहील, पण ही जी शिवरायांची खरी स्मारकं आहेत ती जर आपण जपली नाहीत तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही.”

“शिवाजी महाराजाचे स्मारक समुद्रात बांधता येत नसेल तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधा. महाराजांचा त्या किल्ल्यावर वावर होता हे सांगणारे अनेक पुरावे आहेत. तिथे त्यांचे राज्यातील एकमेव मंदिर आहे. मात्र सत्ताधारी राजकारणी लोकांच्या भावनेशी खेळत महाराजांच्या नावाने राजकारण करत आहेत. त्यापेक्षा किल्ले संवर्धन करणाऱ्या संस्थांच्या पाठिशी उभे राहा,” असं मत राजू पाटील यांनी व्यक्त केलं. स्मारके लोकसहभागातून झाली पाहिजे हे यापूर्वी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब्लू प्रिंटमधून मागणी केली आहे.

हेही वाचा :

पत्रीपुलाला हेरिटेजचा दर्जा द्या, मनसे आमदार राजू पाटलांची उपरोधिक मागणी

मुंबईत जाण्यासाठी लोकल सेवा सुरु करा, मनसे नेते राजू पाटील यांची मागणी

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करा! शिवसेनेची भूमिका मनसेकडून हायजॅक

संबंधित व्हिडीओ :

MNS MLA Raju Patil on fort development

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.