झेंडा बदलल्यानंतर ‘मनसे’ची नवी रणनीती, वर्धापन दिन सोहळा यंदा नवी मुंबईत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलल्यानंतर मनसेने आता नवी रणनिती आखली (MNS Party anniversary celebration) आहे.

  • विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 11:15 AM, 23 Feb 2020
झेंडा बदलल्यानंतर 'मनसे'ची नवी रणनीती, वर्धापन दिन सोहळा यंदा नवी मुंबईत

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलल्यानंतर आता नवी रणनीती आखली (MNS Party anniversary celebration) आहे. येत्या 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन आहे. यंदाचा वर्धापन दिन सोहळा हा नवी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. पक्षाच्या वाढीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालिका निवडणुकीसाठी मनसेने नवनवीन रणनीती आखण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर मनसेनं पक्षवाढीसाठी अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार मनसे आता फक्त मुंबईपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर इतर ठिकाणीही मनसेचे कार्यक्रम घेणार आहे.

या नव्या बदलाची सुरुवात मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमापासून होणार आहे. येत्या 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन आहे. यानिमित्ताने मनसेने ठाण्यात कार्यक्रम आयोजित केला आहे. तर यंदा मनसेचा वर्धापन दिनाचा सोहळाही नवी मुंबईत होणार आहे. विशेष म्हणजे फक्त मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातच नव्हे तर राज्यभरात मनसेचे कार्यक्रम घेतले जाणार (MNS Party anniversary celebration) आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष वाढीसाठी आणि पक्ष बांधणीसाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी यासाठीही हा नवा प्रयत्न असल्याचे बोललं जात आहे.

मनसेचा नवा अजेंडा

गेल्या महिन्यात 23 जानेवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मनसेच्या महाअधिवेशन आयोजित केलं होतं. यावेळी राज ठाकरेंनी यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. महाअधिवेशनाच्या सुरुवातीलाच मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करुन राज ठाकरेंनी पक्ष कात टाकत असल्याचे संकेत दिले होते.

विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात (MNS Party anniversary celebration) आली.