AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेचा वर्धापन दिन सोहळा यंदा नवी मुंबईत, शॅडो कॅबिनेट जाहीर होण्याची शक्यता

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलल्यानंतर आता नवी रणनीती आखली (MNS Party anniversary celebration) आहे.

मनसेचा वर्धापन दिन सोहळा यंदा नवी मुंबईत, शॅडो कॅबिनेट जाहीर होण्याची शक्यता
| Updated on: Mar 08, 2020 | 11:51 AM
Share

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या (9 मार्च) 14 वा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार (MNS Party anniversary celebration) आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. मनसे नेते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राज ठाकरे शॅडो कॅबिनेटवर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

यंदाचा वर्धापन दिन सोहळा हा नवी मुंबईत आयोजित करण्यात (MNS Party anniversary celebration) आला आहे. पक्षाच्या वाढीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे शॅडो कॅबिनेट जाहीर करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत शॅडो कॅबिनेटवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

झेंडा बदलल्यानंतर ‘मनसे’ची नवी रणनीती, वर्धापन दिन सोहळा यंदा नवी मुंबईत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलल्यानंतर आता नवी रणनीती आखली आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने ही रणनिती आखली आहे. मनसेनं पक्षवाढीसाठी अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार यंदा पक्षाचा वर्धापन दिन मुंबईबाहेर साजरा होणार आहे. नवी मुंबईतील विष्णूदास भावे नाट्यगृहात मनसेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष वाढीसाठी आणि पक्ष बांधणीसाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी यासाठीही हा नवा प्रयत्न असल्याचे बोललं जात आहे.

मला दहावीला फक्त 37 टक्के गुण; ‘तो’ सिनेमा मी 32 वेळा पाहिला : राज ठाकरे

मनसेचा नवा अजेंडा

गेल्या महिन्यात 23 जानेवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मनसेच्या महाअधिवेशन आयोजित केलं होतं. यावेळी राज ठाकरेंनी यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. महाअधिवेशनाच्या सुरुवातीलाच मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करुन राज ठाकरेंनी पक्ष कात टाकत असल्याचे संकेत दिले होते.

विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात (MNS Party anniversary celebration) आली.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका