Video : मी काय राज कुंद्रा आहे का?, राज ठाकरेंचा खोचक प्रश्न, उपस्थितांमध्ये हशा

माध्यमांच्या कॅमेरामननी त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. कॅमेराचा आवाज आणि फ्लॅशमुळे राज ठाकरे काहीसे वैतागल्याचं पाहायला मिळाले. त्यावेळी त्यांनी मी काय कुंद्रा आहे का? असा सवाल या कॅमेरामनना केला.

Video : मी काय राज कुंद्रा आहे का?, राज ठाकरेंचा खोचक प्रश्न, उपस्थितांमध्ये हशा
राज ठाकरे
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jul 28, 2021 | 6:03 PM

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा पुण्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आपल्या तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यात राज ठाकरे 9 मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांनी माध्यमांच्या कॅमेरामनला केलेल्या एका प्रश्नाची जोरदार चर्चा होतेय. राज ठाकरे पुण्यातील मनसे कार्यालयात पोहोचले. त्यावेळी माध्यमांच्या कॅमेरामननी त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. कॅमेराचा आवाज आणि फ्लॅशमुळे राज ठाकरे काहीसे वैतागल्याचं पाहायला मिळाले. त्यावेळी त्यांनी मी काय कुंद्रा आहे का? असा सवाल या कॅमेरामनना केला. राज ठाकरे यांच्या या प्रश्नामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. (MNS president Raj Thackeray on Pune tour, question to media cameraman about Raj Kundra)

राज ठाकरे मनसे कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी माध्यमांच्या कॅमेरामननी त्यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी सगळं झालं? कान, नाक, घसा… केस? किती वेळा तेच तेच घेता रे. मी काय कुंद्रा आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. त्यांच्या या प्रश्नावर उपस्थित माध्यम प्रतिनिधी आणि कॅमेरामनमध्ये चांगलाच हशा पिकला. स्वत: राज ठाकरेही यावेळी मिश्किल हसले.

राज ठाकरेंनी चिमुकल्याच्या हट्ट पुरवला!

राज ठाकरेंचं फक्त राजकारणातच नाही तर सर्व वयोगटात फॅन्स आहेत. पुणे दौऱ्यात राज ठाकरेंची एक चिमुरडा फॅन दिसून आला . राज ठाकरे यांनी या फॅनला ऑटोग्राफ दिला. नगरसेवक, मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या पाठीवर वही ठेवून राज ठाकरे यांनी वहीवर सही केली. यावेळी उपस्थित सर्वजण अचंबित झाले.

राज ठाकरेंच्या पुण्यातील दौऱ्यात या चिमुरड्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतल्याचं बघायला मिळालं. कारण तिसरीत शिकणारा सोहम जगताप आईशी भांडून राज ठाकरेंचा ऑटोग्राफ घ्यायला आला होता. राज यांनीही मग खुल्या दिल्याने या चिमरड्या फँनचे लाड पुरवले. मी राज ठाकरेंना म्हटलं, ऑटोग्राफ द्या, त्यांनी मग देतो म्हणाले. मला ते आवडतात म्हणून मी त्यांची ऑटोग्राफ घेतली, असं सोहमने सांगितलं.

संबंधित बातम्या :

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्क्यांची कपात

Photo : दरडग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी फडणवीस, दरेकर मोरगिरीत, निवारा छावणीत दरडग्रस्तांसोबत दोन घास!

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें