केंद्र सरकार अंडरवर्ल्डप्रमाणे वागतंय; सेलिब्रिटींच्या ट्विटवरुन नाना पटोलेंचा प्रहार

मोदी सरकारच्या हुकुमशाही वृत्तीमुळे देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. 70 दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. | Modi govt

केंद्र सरकार अंडरवर्ल्डप्रमाणे वागतंय; सेलिब्रिटींच्या ट्विटवरुन नाना पटोलेंचा प्रहार
नाना पटोले

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी प्रत्येकाला आपल्या पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू आणि काँग्रेसला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनवू, असा निर्धार महाराष्ट्र काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला. (Congress leader Nana patole slams Modi govt)

ते सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. मोदी सरकारच्या हुकुमशाही वृत्तीमुळे देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. 70 दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी केंद्रातील सरकार शेतकऱ्यांना देशद्रोही, खलिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. आता या देशात भाजप विरूद्ध शेतकरी अशी लढाई सुरु झाली असून काँग्रेस पक्ष या लढाईत शेतक-यांसोबत आहे. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना महाराष्ट्रातूनही मोठे बळ देऊ असे सांगून पटोले यांनी आपले इरादे स्पष्ट केले.

नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुंबई काँग्रेसच्यावतीने त्यांच्या पदग्रहण समारंभाच्या तयारीसाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे माजी आध्यक्ष एकनाथराव गायकवाड, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, माजी आमदार युसुफ अब्राहमी, प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, डॉ. संजय लाखे पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामकिशन ओझा, देवानंद पवार, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अजंता यादव यांच्यासह प्रदेश काँग्रेस व मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी, फ्रंटल व सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत 12 तारखेला होणाऱ्या पदग्रहण कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

‘केंद्र सरकार अंडरवर्ल्डप्रमाणे वागतंय’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत बोलले ही नवीन बातमी आहे. कारण पंतप्रधान झाल्यापासून ते संसदेऐवजी निवडणूक प्रचारांच्या सभांमध्येच बोलतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे उदाहरण देतात, मग जीएसटीचा जो कायदा मनमोहन सिंह आणू पाहत होते त्यात बदल करून त्याला मोदींनी गब्बरसिंह टॅक्स का बनवले? या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

एक काळ होता अंडरवर्ल्डचे लोक दबाव आणून सेलिब्रिटींना वागायला लावतात, अशी चर्चा होती पण आता तर केंद्रातील भाजप सरकार जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे विचलीत करण्यासाठी सेलिब्रिटींचा वापर करत आहे. सरकारही अंडरवर्ल्ड प्रमाणे वागत आहे, ही बाब गंभीर आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

Fact Check | मिया खलिफाच्या पोस्टरला काँग्रेस कार्यकर्ते केक भरवतानाचा फोटो व्हायरल, खरं काय?

खासगी शाळांना फीवरुन विद्यार्थ्यांना शाळेतून काढता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

VIDEO: शांत रहाणं म्हणजे अन्याय करणाऱ्याला साथ देणं, नसीरुद्दीन शाह यांची मोदी सरकारवर टीका

(Congress leader Nana patole slams Modi govt)

Published On - 7:20 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI