Mohit Kamboj car attack: कलानगरच्या सिग्नलवर नेमकं घडलं काय? मोहित कंबोज यांची पहिली प्रतिक्रिया

Mohit Kamboj first reaction : पहिली प्रतिक्रिया देताना आपल्यावर केलेले सगळे आरोप फेटाळून लावलेत.

Mohit Kamboj car attack: कलानगरच्या सिग्नलवर नेमकं घडलं काय? मोहित कंबोज यांची पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 10:22 PM

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (BJP Leader Mohit Kamboj)  यांनी आपल्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी (Mohit Kamboj Car attack first Reaction) पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसैनिकांनी मातोश्रीजवळ मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला.  मोहित कंबोज यांनी रेकी करण्यासाठी कलानगर (Kalanagar) भाागात आले असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातो आहे. त्यामुळे त्यांनी हा हल्ला केला असं सांगितलं जातंय.  त्यावरही कंबोज त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मोहित कंबोज यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना याबाबतची आपली पहिली प्रतिक्रिया देताना आपल्यावर केलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी या संपूर्ण घटनेवेळी काय घडलं, हे त्यांनी सांगितलंय. दरम्यान, या हल्ल्याच्या घटनेनंतर आता पोलिसांना कलानगर परिसरात पोलीस फौजफाटा वाढवण्यात आला आहे. कलनगर परिराला आता छावणीचं स्वरुप आलंय. तसंच मोहित कंबोज यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

पहिली प्रतिक्रिया काय?

मोहित कंबोज यांच्या गाडीचं नुकसान या हल्ल्यावेळी करण्यात आलंय. मोहित कंबोज यांनी म्हटलंय, की…

मी एका पत्रकार मित्राच्या लग्नाला गेलो होते.. तिथे मी चाललो होतो. कलानगर जंक्शनच्या सिग्नला माझी गाडी होती.. शिवसैनिक शंभर दोनशे लोकं आले. त्यांनी हल्ला केला. माझ्या गाडीवर दगडफेक केला.. कसंतरी करुन मी तिथून निघाले… मी निघाल्यानंतरही काही जण दुचाकीवर माझ्यामागे आले… यांच्या भाषेतच जर उत्तर दिलेलं यांना कळत असेल, तर येत्या काळात तशा पद्धतीननंच उत्तर देऊ.. आता मला काय फक्त रेकी करण्याचं काम उरलंय का. माझ्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला गेला. माझ्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला. गाडीच्या दरवाजावर हल्ला गेला.. मला रेकी करण्याची काय गरज आहे… माझ्या घरी जाण्यासाठी हाच रस्ता आहे तर आता त्या रस्त्यावरुन जायचंय नाही का… मी तर केव्हापासून सांगतोय की मला धमक्या येताय.. माझ्या आवाज दाबण्यासाठी मला धमकावलं जातंय.. या हल्ल्यानं मी घाबरुन जाणारा नाहीय…

शिवसेनेची टीका

मोहित कंबोज यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतरही शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली आहे. शिवसैनिकांनी केलेल्या टीकेदरम्यान, मोहित कंबोज हे रेकी करण्यासाठीच आले होते, असा गंभीर आरोप केला आहे.

भोंग्याच्या भूमिकेवरुन राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचं मोहित कंबोज यांनी समर्थन केलं होतं. त्यानंतर त्यांनी मोफत भोंगे देण्याचंही जाहीर केलं होतं. अनेक मंदिरांना मोहित कंबोज यांनी भोंगे दिलेही. दरम्यान, मशिदींवरील भोंगे विरुद्ध हनुमान चालीसा असा इशारा दिलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका आता भाजपनं टेक ओव्हर केल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणणाचा इशारा दिलाय. त्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य मुंबईतही दाखल झालंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मातोश्री परिसरात प्रचंड गदारोळ शुक्रवारी दिवसभर पाहायला मिळाला. त्यानंतर दिवस संपता संपता मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानं वातावरण आणखीनंच तापलंय.

पाहा मोहित कंबोज यांनी काय म्हटलं?

कलानगर येथील शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांना सुनावलं

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.