बॉलिवूडच नाही, राजकारण आणि क्रिकेटमध्येही ड्रग अ‍ॅडिक्ट, खासदार नवनीत राणा यांचा आरोप

"कोणत्याच इंडस्ट्रीला आपण पूर्णपणे दोष देऊ शकत नाही. त्याचा एक छोटासा भाग आहे, जे ड्रग्जचे सेवन करतात. संपूर्ण बॉलिवूडला बदनाम करु नका" असे नवनीत कौर राणा म्हणाल्या.

बॉलिवूडच नाही, राजकारण आणि क्रिकेटमध्येही ड्रग अ‍ॅडिक्ट, खासदार नवनीत राणा यांचा आरोप

नवी दिल्ली : फक्त बॉलिवूडच नाही, तर राजकारण आणि क्रिकेटमध्येही ड्रग्ज घेणाऱ्या व्यक्ती आहेत, असा आरोप अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी केला आहे. संसदेच्या अधिवेशनानिमित्त नवनीत राणा सध्या राजधानी दिल्लीत आहेत. “महाराष्ट्र सरकार कोरोनावर फेल झाली आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. (MP Navneet Rana claims apart from Bollywood Politics and Cricket has drug addicts as well)

“बॉलिवूडला टार्गेट केले आहे, पण या बॉलिवूड-टॉलिवूडने आमच्यासारख्या अनेक कलाकारांना नाव, प्रसिद्धी दिली आहे. आपण कोणत्याच इंडस्ट्रीला पूर्णपणे दोष देऊ शकत नाही. त्याचा एक छोटासा भाग आहे, जे ड्रग्जचे सेवन करतात. तुम्ही त्यांना बोला, पण संपूर्ण बॉलिवूडला बदनाम करु नका, देशातच नाही, तर जागतिक पातळीवर बॉलिवूडची प्रतिमा मलीन होत आहे” असे नवनीत कौर राणा म्हणाल्या.

“काही टक्के राजकीय नेत्यांची मुलेसुद्धा ड्रग्ज प्रकरणात आहेत. क्रिकेटचे तर ड्रग्जशी जुने कनेक्शन आहे. अमुक एका क्रिकेटपटूने ड्रग्ज घेतल्याचे आपण अनेकदा ऐकतो. बॉलिवूड ही अशी इंडस्ट्री आहे, जिला फक्त महाराष्ट्रातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आदराने पाहिले जाते. त्यामुळे तुम्ही अशी सरळ टीका करु शकत नाही. मी याबाबत कोणाचंही समर्थन करु शकत नाही” असेही नवनीत राणा म्हणाल्या.

पहा व्हिडीओ :

काय आहे प्रकरण?

चित्रपटसृष्टीतील अंमली पदार्थांच्या वापराचा मुद्दा खासदार रवी किशन यांनी सोमवारी लोकसभेत उपस्थित केला होता. त्याला राज्यसभेच्या शून्य प्रहरात उत्तर देताना मंगळवारी जया बच्चन म्हणाल्या की ‘सरकारने मनोरंजन विश्वाच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे, कारण मनोरंजन विश्वच नेहमी सरकारच्या मदतीला येते. एखादी राष्ट्रीय आपत्ती आल्यास ते पुढे येतात, पैसे देतात, सेवा बजावतात. काही जणांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा मलीन करणे चुकीचे आहे” (MP Navneet Rana claims apart from Bollywood Politics and Cricket has drug addicts as well)

“मनोरंजन विश्वामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव आणि ओळख मिळते, पण मनोरंजन विश्वाचा भाग असलेल्या लोकसभा खासदाराने फिल्म इंडस्ट्रीविरोधात भाष्य केले. याची मला अत्यंत लाज वाटली. ज्या ताटात खाता, त्यातच भोक पाडता. आम्हाला संरक्षण आणि सरकारचा पाठिंबा हवा” अशी मागणी जया बच्चन यांनी केली.

संबंधित बातम्या :

आमचे वेतन घ्या, पण खासदार निधी कापू नका, नवनीत राणा यांची लोकसभेत विनंती

जया बच्चन यांनी नीट ऐकले नाही, किंवा त्यांना समजले नाही, राजू श्रीवास्तवांकडून रवी किशनची पाठराखण

जया बच्चन यांचा भाजप खासदार रवी किशनवर अप्रत्यक्ष निशाणा, अभिषेकचे नाव घेत कंगनाचे जहरी ट्वीट

(MP Navneet Rana claims apart from Bollywood Politics and Cricket has drug addicts as well)

Published On - 3:45 pm, Wed, 16 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI