आमचे वेतन घ्या, पण खासदार निधी कापू नका, नवनीत राणा यांची लोकसभेत विनंती

खासदारांचे पगार घ्या, पण निधीत कपात करु नका, अशी विनंती नवनीत कौर राणा यांनी केली.

आमचे वेतन घ्या, पण खासदार निधी कापू नका, नवनीत राणा यांची लोकसभेत विनंती

नवी दिल्ली : खासदारांचे वेतन घ्या, पण खासदार निधी कापू नका, अशी विनंती अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी केली. पावसाळी अधिवेशनानिमित्त राजधानी दिल्लीत असलेल्या नवनीत राणा यांनी लोकसभेत बोलताना ही मागणी केली. (MP Navneet Ravi Rana asks to take MPs salaries, but not to cut MP funds)

“कृपया आमचे (खासदारांचे) पगार घ्या, पण कृपा करुन मतदारसंघाच्या विकासासाठी दिला जाणाऱ्या निधीत कपात करु नका” अशी विनंती नवनीत कौर राणा यांनी केली. लोकसभेने संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन (दुरुस्ती) विधेयक 2020 मंजूर केले. यावरील चर्चेदरम्यान नवनीत राणा यांनी मागणी केली. यानुसार खासदारांचे 30 टक्के वेतन पुढील वर्षभरासाठी कापले जाईल.

“माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी एकही शब्द न बोलणं म्हणजे त्या हल्ल्याचं समर्थन आहे, अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली होती. संवेदनाहीन मुख्यमंत्री याबाबत दिलगिरी सुद्धा व्यक्त करत नाहीत. हा संपूर्ण देशातील माजी सैनिकांचा अपमान आहे. या प्रकरणी लोकसभेत आवाज उचलणार आहे” असेही त्या म्हणाल्या होत्या. (MP Navneet Ravi Rana asks to take MPs salaries, but not to cut MP funds)

“पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना प्रत्यक्ष भेटून माजी सैनिकांची कैफियत मांडणार आहे. याबाबत न्याय मिळवून देऊ. देशातील कुठल्याही माजी सैनिकांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. गुंडप्रवृत्तीच्या हल्लेखोर शिवसैनिकांना कठोर शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही” असे नवनीत राणा म्हणाल्या होत्या.

नवनीत कौर राणा यांना 6 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील 12 जण कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीला अमरावतीतील घरीच उपचार करण्यात आले. नंतर त्रास वाढल्याने आधी नागपुरातील वोकहार्ट रुग्णालयात तर नंतर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले. आता त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.

संबंधित बातम्या :

नि. नौदल अधिकारी मारहाण : मुख्यमंत्र्यांनी एकही शब्द न बोलणं म्हणजे या हल्ल्याचे समर्थन : नवनीत राणा

जया बच्चन यांचा भाजप खासदार रवी किशनवर अप्रत्यक्ष निशाणा, अभिषेकचे नाव घेत कंगनाचे जहरी ट्वीट

(MP Navneet Ravi Rana asks to take MPs salaries, but not to cut MP funds)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *