Navneet Rana : खासदार नवनीत राणांना जेजे रुग्णालयात हलवलं, प्रकृती आणखी खालावली?

खासदार नवनीत राणा यांना भायखळा जेलमधून जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं.

Navneet Rana : खासदार नवनीत राणांना जेजे रुग्णालयात हलवलं, प्रकृती आणखी खालावली?
नवनीत राणा, रवी राणाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 9:53 AM

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना भायखळा जेलमधून जेजे रुग्णालयात हलवण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच आव्हान दिलं होतं. त्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आणि आता जामिनासाठी राणा दाम्पत्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी राणा दाम्पत्याचा अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे. कारण राणा यांच्या खारमधील घराची मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) तपासणी करणार आहे. तशी नोटीसच मुंबई महापालिकेकडून बजावण्यात आली आहे. घरात मंजूर आराखड्या व्यतिरिक्त अधिकचे बांधकाम, काही नियमांचे उल्लंघन केले असल्याच्या तक्रारीवरुन मुंबई महापालिकेनं तपासासाठी नोटीस पाठवली आहे.

राणा दाम्पत्याच्या जामिनावर आज निर्णय

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. कारण राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील निर्णय आज दिला जाणार आहे. वेळेअभावी मुंबई सत्र न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवल्याचं सांगितलं होतं. राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी दिलेल्या माहितीनुसार कोर्ट दुसऱ्या प्रकरणांमध्ये व्यस्त होती. तरीही थोडा फार वेळ देत कोर्टानं निकाल वाचनास सुरुवात केली आहे. मात्र वेळेअभावी आज कोर्ट निकाल देऊ शकलं नाही. त्यामुळे आता या प्रकरणावर आज निर्णय येण्याची अपेक्षा आहे. आज निकाल वाचन होऊन निर्णय दिला जाईल. पहिल्या सत्रातच कोर्ट निकाल देईल, असं मर्चंट यांनी सांगितलं होतं.

निकाल राखून ठेवला होता

कोर्टाच्या व्यस्त कामकाजामुळे आणि अपुऱ्या वेळेमुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात आला आहे. आज सकाळी 11 वाजेपर्यंत या प्रकरणाचं निकाल वाचन पूर्ण होईल. न्यायाधीश रोकडे यांचं खंडपीठ हा निर्णय देणार आहे. दरम्यान, शनिवार पासून या निर्णयाचा निकाल प्रलंबित आहे. शनिवारीही वेळेअभावी निकाल राखून ठेवण्यात आला होता आणि आज पुन्हा एकदा व्यस्त कामकाज आणि वेळेअभावी या प्रकरणाचा निकाल आता आज दिला जाणार आहे. 

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.