थेट पवारांना भिडण्यासाठी जानकर-शेट्टींची गुप्त बैठक

पुणे : भाजप-शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची पुण्यात गुप्त बैठक पार पडली. राजू शेट्टी स्वाभिमानीसाठी 15 जागांची यादी तयार असून, महादेव जानकर हे तीन जागांसाठी आग्रही आहेत. या दोन्ही छोट्या पक्षांच्या यादीत बारामती आणि माढ्याच्या जागेचा समावेश आहे. त्यामुळे जानकर आणि …

थेट पवारांना भिडण्यासाठी जानकर-शेट्टींची गुप्त बैठक

पुणे : भाजप-शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची पुण्यात गुप्त बैठक पार पडली. राजू शेट्टी स्वाभिमानीसाठी 15 जागांची यादी तयार असून, महादेव जानकर हे तीन जागांसाठी आग्रही आहेत. या दोन्ही छोट्या पक्षांच्या यादीत बारामती आणि माढ्याच्या जागेचा समावेश आहे. त्यामुळे जानकर आणि शेट्टी दोघेही मिळून थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देऊ पाहत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह दोन्ही पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी पुण्यातील बैठकीला उपस्थित होते.

राजू शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे काही जागांची मागणी केली आहे, तर महादेव जानकरांनी शिवसेना-भाजप युतीकडे काही जागांची मागणी केली आहे. मात्र, आघाडी किंवा युती दोन्हींकडून या दोन्ही पक्षांना काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने, शेट्टी-जानकरांच्या हालचालींना वेग आला आहे.

कॅबिनेट मंत्री महादेव जानकर राजीनाम्याच्या तयारीत, या दोन जागांसाठी आग्रह

महादेव जानकर यांचा माढा आणि बारामती या दोन जागांसाठी विशेष आग्रह आहे. काल मुंबईतील महत्वाची बैठक सोडून जानकर गायब झाले आणि अत्यंत महत्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. लोकसभेसाठी दोन जागा देण्याचा निर्णय युतीने घेतला नाही, तर दोन दिवसात मंत्रीपदाचा राजीनामा देणार अशी धमकी देऊन जानकर गायब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *