AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती संभाजीराजेंची पन्नाशी, जनतेच्या सेवेची संधी मिळो, अंबाबाईला साकडं

राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा आज 50 वा वाढदिवस... | MP Sambhajiraje 50th Birthday

छत्रपती संभाजीराजेंची पन्नाशी, जनतेच्या सेवेची संधी मिळो, अंबाबाईला साकडं
वाढदिनी संभाजीराजेंनी घेतलं अंबाबाईचं दर्शन
| Updated on: Feb 11, 2021 | 11:40 AM
Share

कोल्हापूर :  राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा आज 50 वा वाढदिवस… गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी संभाजीराजेंचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. तसंच मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी संभाजीराजेंनी पुढाकार घेत सरकारला धारेवर धरुन समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरला जाऊन त्यांना खास शुभेच्छा देणार आहेत. (MP Sambhajiraje 50th Birthday, Took A Blessing Of Ambabai kolhapur)

वाढदिवसादिनी अंबाबाईचं दर्शन

वाढदिवसानिमित्त आज सकाळीच छत्रपतींनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. लोकांची सेवा करण्याचं आणखी बळ मिळू देत, असं साकडं त्यांनी अंबाबाई चरणी घातलं. दुसरीकडे सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून आज कोल्हापुरात दुर्गा परिषदेचंही आयोजन केलं गेलं आहे.

शिवशाहूंचा विचार लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध

आतापर्यंत सामाजिक आणि राजकीय माध्यमातून मला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. अशीच सेवेची संधी इथून पुढेही मिळो. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कारण ठरावं. शिव शाहूंचा विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मी कायम कटिबद्ध असेल. शिवशाहूंच्याप्रमाणे एक टक्का जरी काम करू शकलो तरी माझ्या जीवनाचं सार्थक होईल, अशा भावना संभाजीराजे यांनी वाढदिवसानिमित्त बोलून दाखवल्या.

देवेंद्र फडणवीस कोल्हापूरला जाणार

छत्रपती संभाजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस खास कोल्हापूरला जाऊन छत्रपतींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत. छत्रपतींचं निवासस्थान असलेलं न्यू पॅलेसवर आज संध्याकाळी फडणवीस हजेरी लावणार आहेत.

(MP Sambhajiraje 50th Birthday, Took A Blessing Of Ambabai kolhapur)

हे ही वाचा :

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली, विमानातून उतरुन कोश्यारी राजभवनात

अविनाश भोसलेंचा मुलगा ईडीच्या ताब्यात, अमित भोसलेंना पुण्यावरुन मुंबईत आणलं

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.