AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या महापौरांनी भाजपचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा फेटाळला

महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर भाजपने शिवसेनेला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला (BJP demand refuse Mumbai BMC) होता.

मुंबईच्या महापौरांनी भाजपचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा फेटाळला
| Updated on: Mar 05, 2020 | 5:56 PM
Share

मुंबई : राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपनं आता मिशन बीएमसी 2022 वर लक्ष केंद्रीत केलं (BJP demand refuse Mumbai BMC)  आहे. राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर भाजपने शिवसेनेला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला होता. मात्र महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा दावा फेटाळला आहे.

भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या नावाची विरोधी पक्षनेतेपदासाठी आणि गटनेतेपदासाठी शिफारस (BJP demand refuse Mumbai BMC) केली होती. मात्र महापौर पेडणेकर यांनी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता नेमला आहे. त्यामुळे दुसरा विरोधी पक्षनेता नेमता येणार नाही असे सांगितले. विरोधी पक्षनेतेपदावरील दावा फेटाळल्यानंतर सभागृहात भाजप नगरसेवकांनी मोठा गोंधळ घातला. त्यानंतर नगरसेवकांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर महापालिकेत भाजपने मोठे फेरबदल केले आहेत. आतापर्यंत पहारेकऱ्यांच्या भुमिकेत असणाऱ्या भाजपनं आता विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला होता. तसेच भाजपने आपला महापौर बसवण्याचा निर्धार केला आहे. त्या पार्श्वभूमीवर नव्या नियुक्ती केल्या आहेत. खासदार झालेल्या मनोज कोटकांच्या जागी गटनेता म्हणून विनोद मिश्रा यांची नेमणूक झाली आहे. त्यामुळे नव्या फेरबदलांसह भाजपची तोफ महापालिकेत धडाडताना दिसत आहे.

भाजपनं 2017 च्या महापलिका निवडणुकांनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही त्यावेळी विरोधी पक्षात बसणं टाळलं. त्यावेळी राज्यात भाजप-सेनेच्या युतीची सत्ता होती. मात्र ज्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी महापालिकेत भाजपनं शिवसेनेच्या विरोधात जाण्याच टाळलं, त्याच विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेबाहेर राहावं (Mumbai BMC 2022 Election) लागलं.

त्यामुळे आता बदललेल्या गणितांसोबत भाजपची भुमिकाही बदलणार आहे. भाजपचे स्वीकृत सदस्य गणेश खनकर यांना बाहेरचा रस्ता दाखवत पालिकेत प्रभारी म्हणून नेमणूक झालेल्या भालचंद्र शिरसाट यांना पालिकेत इन केलं जाणार आहे. त्यासाठी ही जागा खाली करण्यात आली आहे. शिवसेनेवर प्रहार करण्यासाठी भाजपची ही रणनीती असणार आहे.

भाजपचा विरोधी पक्ष नेता होण्यास अडचणी काय??

महापालिका निवडणुकीनंतर भाजपनं विरोधी पक्षनेते पद नाकारले होते आणि पहारेकऱ्याची भूमिका स्वीकारली होती. त्यावेळी राज्यात भाजप- सेनेची युती होती. त्यामुळे तिसरा पक्ष असलेल्या काँग्रेसला हे पद मिळाले. त्यावेळी याबाबत न्यायिक सल्ला घेण्यात आला होता.

विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत हे पद भाजपला मिळणं कठीण आहे. 37IA , 37IA1 अनुसार गटनेता असलेला सदस्यच विरोधी पक्ष नेता म्हणून निवडला जातो. मात्र भाजपनं गटनेता आणि विरोधी पक्ष नेते पदासाठी दोन वेगवेगळी नावं दिली आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेवर आता भाजपची हालचाल अवलंबून असेल.

राज्याप्रमाणेच जर काँग्रेस महापालिकेच्या सत्तेत सहभागी झाली. तरच भाजपचा विरोधी पक्षाचा मार्ग मोकळा होऊ (Mumbai BMC 2022 Election) शकतो.

मुंबई महापालिकेत भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा, नव्या फेरबदलासह भाजपची सेनेला टक्कर

तांत्रिकदृष्ट्या भाजपला अधिकृतरित्या विरोधी पक्ष नेता पद मिळाले नाही तरी, भाजप स्वयंघोषित विरोधी पक्ष म्हणून आक्रमक होण्याच्या तयारीत आहे. येत्या काळात महापालिकेतील घोटाळे, गैरव्यव्हार बाहेर काढण्याची जबाबदारी अनुभवी नगरसेवकांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे 2017 च्या महापालिका निवडणुकीनंतर राज्यातील युतीच्या संसारासाठी थंडावलेला भाजप-सेनेतला कलगीतुरा पुन्हा एकदा पालिकेत पाहायला मिळेल.

गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेसोबत सत्तेत थेट सहभागी झाली नव्हती. शिवसेनेला मुंबई महापौर पदावर दावा करण्यासाठी बहुमताचा जादुई आकडा 113 होता. त्यासाठी भाजपने शिवसेनेला मदत केली (Mumbai BMC 2022 Election) होती.

मुंबई महापालिका संख्याबळ

शिवसेना – 96 भाजप – 82 काँग्रेस – 29 राष्ट्रवादी काँग्रेस – 8 समाजवादी पार्टी – 6 एमआयएम – 2 मनसे – 1 अभासे – 1

BJP demand refuse Mumbai BMC

Follow Us
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर.
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत...
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत....
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप.
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार....
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात...
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी.....
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?.
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव.
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...