Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषी-सहकार क्षेत्र अन् निवडणुका; अमित शाह यांना भेटताच एकनाथ शिंदे यांनी ‘तो’ निर्धार बोलून दाखवला

CM Eknath Shinde Tweet : अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांचं ट्विट; म्हणाले 'या' विषयांवर चर्चा केली

कृषी-सहकार क्षेत्र अन् निवडणुका; अमित शाह यांना भेटताच एकनाथ शिंदे यांनी 'तो' निर्धार बोलून दाखवला
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 11:13 AM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी कृषी, सहकार विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली. तसंच आगामी निवडणुकांबाबतही त्यांनी निर्धार बोलून दाखवला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विट

काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली, असं ट्विट शिंदेंनी केलं आहे.

राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री श्री. शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली, असं ते म्हणालेत.

राज्यात आगामी सर्व निवडणुका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, राखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार…, असं एकनाथ शिंदे ट्विटमध्ये म्हणालेत.

मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा?

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी झालेल्या अमित शाह यांच्या भेटीत आगामी कॅबिनेट विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे. महिलांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात येणार आहे. महिलांचा सन्मान ही प्राथमिकता असल्याचं कळतं आहे. युवा नेत्यांना या कॅबिनेटमध्ये संधी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. शिवीगाळ करणार, आक्षेपार्ह वक्तव्य, वर्तन करणारे नेते दूर ठेवा. घरी किंवा बंगल्यावर बसून नाही तर फिल्डवर ऊतरून काम करणारे नेते कॅबिनेटमध्ये घ्या, अशी मुख्यमंत्र्यांची भावना असल्याचं कळतं आहे.

महायुतीवर लागलेला 50 खोके एकदम ओके या डागाला कामाच्या माध्यमातून उत्तर देण्यावर जोर असल्याचं कळतंय. राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक जास्त परिश्रम करावेत, अशीही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे.

शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर काही दिवसांआधी भेट झाली. या भेटीवरही चर्चा झाली असल्याची माहिती आहे. तसंच महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांवर केंद्र सरकारचं मार्गदर्शन आणि सहाकार्यावर चर्चा झाली.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.