VIDEO | आमच्या कुंदा वहिनी वयस्कर, राजसाहेब एक विनंती करते, महापौरांनी हात जोडले

दोनच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे आणि बहीण जयजयवंती देशपांडे यांनी कोरोनाची लस टोचून घेतली. (Kishori Pednekar appeals Raj Thackeray)

VIDEO | आमच्या कुंदा वहिनी वयस्कर, राजसाहेब एक विनंती करते, महापौरांनी हात जोडले
किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंना हात जोडून विनंती

मुंबई : कोरोना प्रादुर्भाव असतानाही मास्क न घालण्याचा अट्टाहास करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विनंती केली. आमच्या कुंदा वहिनी वयस्कर आहेत. राजसाहेब, कृपया मास्क घाला, अशी विनंती महापौरांनी हात जोडून केली. (Mumbai Mayor Kishori Pednekar appeals Raj Thackeray to wear mask says mother Kunda Thackeray is senior citizen)

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

“काही नेते मास्क घालत नाहीत. माझी राज ठाकरे यांना हात जोडून विनंती आहे, की मास्क घाला. कोरोना कोणालाही सोडत नाही. जर आपण बाधित झालात, तर इतरही बाधित होऊ शकतात. आपल्या घरी आपल्या आई, म्हणजे आमच्या कुंदा वहिनी वयस्कर आहेत. त्यामुळे थोडीशी आपणही काळजी घ्या. तुम्हाला अनेक जण फॉलो करतात. तुम्ही अनेकांसाठी अमूल्य आहात, अनेकांचे तुम्ही आयडॉल आहात. मला राज ठाकरेंवर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. प्रशासन कारवाई करेल, पण मी विनंती करते” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

पाहा व्हिडीओ :

कुंदा ठाकरे यांनी लस घेतली

दोनच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे आणि बहीण जयजयवंती देशपांडे यांनी कोरोनाची लस टोचून घेतली. वांद्रे कुर्ला संकुलातील कोव्हिड सेंटरमध्ये ही लस घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचीही उपस्थिती होती.

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांच्या कॅमेरासमोर मी मास्क घालतच नाही, असं वक्तव्य केलं होतं. तसंच नाशिकच्या दौऱ्यात माजी महापौर अशोक मुर्तडक यांना चेहऱ्यावरील मास्क उतरवण्यास सांगितलं होतं. एकूणच राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याच्या आवाहनामुळे राज्यात कोरोना वाढला असं म्हणत अॅड. रत्नाकर चौरे यांनी औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

राज ठाकरे विनामास्क नाशकात, ‘मास्क काढ’, माजी महापौरांना इशारा

राज ठाकरे कोरोनासंबंधी नियम पायदळी तुडवत विनामास्क फिरताना दिसतात. मी मास्क लावणार नाही, हा त्यांचा अट्टाहास याआधीही पाहायला मिळाला आहे. मात्र नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी मनसेचे नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांनाही मास्क हटवण्यास सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले.

‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावले नव्हता. यावेळी ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं होतं. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ‘त्यांना माझा नमस्कार सांगा,’ असे उत्तर दिले होते. (Mumbai Mayor Kishori Pednekar appeals Raj Thackeray to wear mask says mother Kunda Thackeray is senior citizen)

राज ठाकरेंकडून नियमांची पायमल्ली

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन सरकार करत आहे. मात्र राज ठाकरे यांनी कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत तोंडाला मास्क लावलेला दिसला नाही. साहजिकच राज ठाकरेंच्या तोंडाला मास्क नसलं की लोकांच्यामध्ये चर्चा रंगते.

वर्धापनदिन सोहळा मात्र रद्द

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि गर्दीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे 9 मार्च रोजी असलेला मनसेचा वर्धापनदिन सोहळ्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

राज ठाकरेंच्या मातोश्री आणि बहिणीने घेतली कोरोना लस, शर्मिला ठाकरेंची उपस्थिती

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला; वकिलाची पोलिसात तक्रार

…म्हणून राज ठाकरे मुद्दाम मास्क वापरत नसतील : रामदास आठवले

(Mumbai Mayor Kishori Pednekar appeals Raj Thackeray to wear mask says mother Kunda Thackeray is senior citizen)

Published On - 5:18 pm, Thu, 11 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI