मोठी बातमी! 227 वॉर्डनुसार मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Supreme Court on BMC Election : मुंबई पालिकेच्या (BMC Election 2022) 227 वॉर्डनुसार निवडणूक घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. ही निवडणूक बेकायदेशीर असल्याची याचिका सुर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी देताना हा निर्णय देण्यात आला आहे.

मोठी बातमी! 227 वॉर्डनुसार मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
मुंबई महापालिका
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 11:13 AM

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court on BMC Election 2022) मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुशंगाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पालिकेच्या (BMC Election 2022) 227 वॉर्डनुसार निवडणूक घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. ही निवडणूक बेकायदेशीर असल्याची याचिका सुर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी देताना हा निर्णय देण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारने वॉर्ड रचनेत बदल केला होता. पण त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. महाविकास आघाडी सरकार पडलं आणि एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आलं. नवं सरकार सत्ते आल्यानंतर त्यांनी 2017 साली असलेल्या 227 वॉर्ड प्रमाणे निवडणुका घेतल्या जाव्यात, असा अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं.

सुप्रीम कोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला दणका

शिंदे-फडणवीस सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने 227 वॉर्डप्रमाणे निवडणुका घेण्याच्या अध्यादेशाला स्थगिती  दिली आहे. मुंबईचे माजी उपमहापौर सुहास वाडकर यांनी या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यानंतर सुप्रीम कोर्टात झालेल्या युक्तिवादानंतर अखेर नव्या शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

2017 नंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. त्यातच वॉर्डच्या झालेल्या पुर्नरचनेमुळे आणि नव्या आरक्षणामुळे बहुतांश ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसलाय. दरम्यान, नव्या वॉर्ड रचनेनुसार आता 236 वॉर्डमध्ये मुंबई महापालिकेच्या नगरसेवक पदासाठीची निवडणूक पार पडणार आहे. येत्या महिन्याभरात ही निवडणूक नेमकी कधी होणार, याबाबच स्पष्टता येण्याची शक्यता आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आता शिवसेना मुंबई पालिका निवडणुकीच्या तयारीला आधीपासूनच लागली आहे. शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलसह पालिकेवर एकहाती विजय मिळवण्याचासाठी प्रयत्न सुरु झालेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याबरोबरीने भाजपचंही आव्हान शिवसेनेसमोर आहे. अशात आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीमुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नवा ट्वीस्ट आला आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.