AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युती सरकारमध्ये मोठं कांड होणार आहे; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Chandrakant Khaire on Yuti Government : युती सरकारमध्ये मोठं कांड होणार आहे. बच्चू कडू प्रामाणिक, त्यांचा वापर करून घेतला गेला; 'या' नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

युती सरकारमध्ये मोठं कांड होणार आहे; 'या' नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jul 13, 2023 | 3:48 PM
Share

मुंबई 13 जुलै 2023  : मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावरून युतीमध्ये रस्सीखेच सुरु असतानाच ठाकरे गटाच्या एका नेत्याच्या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यातील युती सरकारमध्ये काहीतरी मोठं कांड होणार आहे, असं ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. तसंच बच्चू कडू आणि त्यांच्या नावाभोवती असणाऱ्या मंत्रिपदाच्या चर्चा यावरही चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केलं आहे.

अजित पवारांमुळे शिंदे गट नाराज आहे. असंतोष वाढत चालला आहे. त्यामुळे काहीतरी मोठं कांड होण्याची शक्यता आहे. हनुमानाची शपथ घेऊन सांगतो सरकारमध्ये काहीतरी मोठं कांड होणार आहे, असं खैरे म्हणालेत.

मंत्रिमंडळ विस्तार होणार होता. पण विस्तार लांबणीवर पडला आहे. कारण हे सरकार अस्थिर आहे. सरकारमध्ये काहीही होऊ शकतं. जनतेचे प्रश्न खोळंबलेले आहेत. जनता यांना धडा शिकवेल, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

सरकार पडेल की नाही हे माहीत नाही. पण हे सरकार अस्थिर आहे. एवढं मात्र सांगू शकतो, असं खैरे म्हणालेत. पकडून-पकडून, रडत-पडत हे लोक सरकार चालवतीलही. पण अनेकांची नाराजी सध्या वाढत आहे, असं खैरेंनी म्हटलं आहे.

बच्चू कडू म्हणाले त्यानुसार भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी युतीमधील वातावरण खराब आहे. बच्चू कडू प्रामाणिक नेते आहेत. ते स्वाभिमानी पण आहेत. पण त्यांचा वापर करून घेतला जात आहे, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी बच्चू कडू यांच्या झालेल्या कोंडीवर भाष्य केलंय.

आम्हाला अनेकवेळा अनेकांनी आमिष दाखवलं. तरीही आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो. पांचटपणा बच्चू कडूला जमत नाही. आम्हाला उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळात स्थान दिलं. मला महाविकास आघाडीत मंत्रिपद दिल्याने मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो, असं बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगतलं. त्यावर चंद्रकांत खैरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

उध्दव ठाकरे चांगले नेते आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी भूमिका घेतात. उद्धव ठाकरे हे शब्द पाळणारे आहेत, हे आता लक्षात येत आहे. बच्चू कडूंना धन्यवाद देतो. त्यांना आज कळालं उद्धव ठाकरे किती चांगले आहेत. त्यामुळे उद्धवजी यांचं नेतृत्व सर्वसमावेशक आहे. यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे, असं चंद्रकांत खैरे म्हणालेत.

संजय शिरसाठ रोज रोज बडबड करतात. त्यामुळे त्यांना का घ्यायचं असं वाटलं असेल, संजय रायमूलकर बडबड करत नाहीत. त्यामुळे कदाचित त्यांना संधी दिली जाईल, असं विधान चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...