मोठी बातमी: भाजप आमदार प्रसाद लाड यांची चौकशी होणार; मुंबई पोलिसांची नोटीस

प्रसाद लाड यांनी 2009 साली मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. | Prasad Lad

मोठी बातमी: भाजप आमदार प्रसाद लाड यांची चौकशी होणार; मुंबई पोलिसांची नोटीस
प्रसाद लाड
Rohit Dhamnaskar

|

Jan 07, 2021 | 7:35 AM

मुंबई: शिवसेना नेत्यांच्या मागे ‘ईडी’चे (ED) शुक्लकाष्ठ लागल्यानंतर आता भाजपच्या एका नेत्यावर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात चौकशीचे गंडांतर ओढवले आहे. भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) चौकशीसाठी समन्स बजावले आहे. साधारण 20 दिवसांपूर्वी त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आता प्रसाद लाड यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. (BJP MLA Prasad Lad will face probe in connection with financial irregularities)

प्राथमिक माहितीनुसार, प्रसाद लाड यांनी 2009 साली मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 2014 साली त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. प्रसाद लाड हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जातात. |

कालच देवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक विश्वासू सहकारी गिरीश महाजन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे.

वर्षा राऊतांना ‘ईडी’कडून आणखी एक समन्स; पुन्हा चौकशी होणार

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) पुन्हा चौकशी होणार आहे. त्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नवे समन्स पाठवले आहे. त्यानुसार वर्षा राऊत यांना 11 जानेवारील पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी 4 जानेवारीला पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तास वर्षा राऊत यांना प्रश्न विचारले होते.

संबंधित बातम्या:

भाजप नेते गिरीश महाजन अडचणीत; पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

मोठी बातमी: वर्षा राऊतांना ‘ईडी’कडून आणखी एक समन्स; पुन्हा चौकशी होणार

मुंबईकर टॅक्स भरत असले तरी ठाकरे सरकारला टक्केवारी मात्र बिल्डर देतात, भातखळकरांचा घणाघात

(BJP MLA Prasad Lad will face probe in connection with financial irregularities)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें