AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ उमेदवाराला आपणच निवडून येऊ असं का वाटतंय?; अंधेरी पूर्व मतदारसंघात काय घडणार?

अपक्ष उमेदवार राजेश त्रिपाठी यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोक मोठ्या संख्येने घराबाहेर येत आहेत आणि मतदान करत आहेत. 6 नोव्हेंबर रोजी मी प्रचंड बहुमताने विजयी होत आहे.

'या' उमेदवाराला आपणच निवडून येऊ असं का वाटतंय?; अंधेरी पूर्व मतदारसंघात काय घडणार?
'या' उमेदवाराला आपणच निवडून येऊ असं का वाटतंय?; अंधेरी पूर्व मतदारसंघात काय घडणार?Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 03, 2022 | 11:31 AM
Share

मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (andheri bypoll) मतदान सुरू झालं आहे. या निवडणुकीचा 6 तारखेला निकाल लागणार आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याने ही निवडणूक एकतर्फी होणार असून ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजय होणार असल्याचं मानलं जात आहे. मात्र, आज मतदानाच्याच दिवशी दोन महत्त्वाच्या प्रतिक्रिया आल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. ऋतुजा लटके यांची तृप्ती सावंत करू नका, असं टोला भाजपचे नेते मुरजी पटेल (murji patel) यांनी ठाकरे गटाला लगावला आहे. तर निवडणुकीतील अपक्ष उमेदवाराने आपणच विजयी होऊ असा दावा केला आहे. त्यामुळे हा अपक्ष आमदार कशाच्या भरोश्यावर हा दावा करतोय, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

भाजप नेते मुरजी पटेल यांनी आज अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान केलं. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ठाकरे गटाला कानपिचक्या देतानाच ऋतुजा लटके यांची तृप्ती सावंत होऊ नये अशी भितीही व्यक्त केली.

आता एकच अपेक्षा आहे ऋतुजा लटकेंची शिवसेनेनं तृप्ती सावंत करु नये. आज त्या निवडणूक लढवत आहेत. जिंकूनही येतील. नंतर ऋतुजा लटकेंना एकटं पाडलं जाऊ नये. जे वांद्र्यात झालं. ते अंधेरीत घडू नये, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. तसेच नोटाचा प्रचार कोणीही करत नाहीये. हा आरोप चुकीचा आहे, असं त्यांनी सांगितलं.

अंधेरीच्या लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावे. आपला मतदानाचा हक्क बजवावा, असं आवाहन त्यांनी केलं. नोटाचा कुणीही प्रचार करत नाहीये. असं काही घडलं नाही. अन् आम्ही असं काही करणार नाही. आम्ही लोकभावना लक्षात घेता आमची उमेदवारी मागे घेतली. त्यांनी त्याचा सन्मान केला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, अंधेरी मतदारसंघातील सर्व 256 मतदान केंद्रांवर मतदानाला सकाळी 7 वाजतापासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली आहे. यात सकाळी 11 वाजेपर्यंत 9.72 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, अपक्ष उमेदवार राजेश त्रिपाठी यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोक मोठ्या संख्येने घराबाहेर येत आहेत आणि मतदान करत आहेत. 6 नोव्हेंबर रोजी मी प्रचंड बहुमताने विजयी होत आहे, असा दावा राजेश त्रिपाठी यांनी केला आहे.

जनतेला सर्व काही माहीत आहे. नोटाच्या प्रचारामुळे काहीही फरक पडणार नाही, असंही त्रिपाठी म्हणाले. अंधेरी पूर्व भागात वाहतुकीची मोठी समस्या आहे. चांगली शाळा, रुग्णालय नाही. त्यामुळे या गोष्टी या भागात झाल्या पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

तसेच कोल्हापूर आणि पंढरपूरमध्ये मतदान झालेय तिथे महाराष्ट्राची संस्कृती दिसत नव्हती, असा चिमटाही त्यांनी काढला.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.