मुकुल वासनिक समर्थकाच्या निलंबनावरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, माजी राज्यमंत्र्यावर षडयंत्राचा आरोप

नागपूर जिल्ह्यात मुकुल वासनिक समर्थक विरुद्ध राजेंद्र मुळक वाद चव्हाट्यावर आला आहे. राजेंद्र मुळक यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप मुकुल वासनिक यांचे निलंबित समर्थक गज्जू यादव यांनी केला आहे.

मुकुल वासनिक समर्थकाच्या निलंबनावरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, माजी राज्यमंत्र्यावर षडयंत्राचा आरोप
(डावीकडून) गज्जू यादव, मुकुल वासनिक, राजेंद्र मुळक
गजानन उमाटे

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 28, 2021 | 8:16 AM

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांच्या समर्थकाचं निलंबन केल्यानंतर राजकारण पेटलं आहे. नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव गज्जू यादव (Gajju Yadav) यांना निलंबित केल्यानंतर जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला ऊत आला आहे. गज्जू यादव यांनी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक (Rajendra Mulak) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

काँग्रेस हायकमांडकडे दाद मागणार

नागपूर जिल्ह्यात मुकुल वासनिक समर्थक विरुद्ध राजेंद्र मुळक वाद चव्हाट्यावर आला आहे. राजेंद्र मुळक यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप वासनिक समर्थक गज्जू यादव यांनी केला आहे. “राजेंद्र मुळक यांचा रामटेक विधानसभेवर डोळा असल्याने खोटे आरोप करत त्यांनी निलंबित केलं” असा आरोप गज्जू यादव यांनी केला. “निलंबनाविरोधात काँग्रेस हायकमांडकडे दाद मागणार” असा इशाराही यादव यांनी दिला आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा काँग्रेसमधला वाद अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?

पक्षशिस्त मोडल्याच्या कारणास्तव नागपूर जिल्हा काँग्रेस महासचिव गज्जू उर्फ उदयसिंग यादव यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं होतं. नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत वाद झाला होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दुधाराम सव्वालाखे यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाची काँग्रेस कमिटीकडून अंतर्गत चौकशी करण्यात आली होती. पक्षशिस्त मोडून गैरवर्तणूक केल्याचा ठपका गज्जू यादव यांच्यावर ठेवण्यात आला.

गज्जू यादव हे नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव होते. नागपूर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर होती.  मात्र पक्षशिस्त मोडून गैरवर्तन केल्याच्या कारणास्तव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यादव यांचे पक्षातून निलंबन करण्याचे आदेश दिले.

निलंबनाच्या पत्रात काय म्हटलंय?

नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत गज्जू उर्फ उदयसिंग यादव यांनी पक्षशिस्त मोडून गैरवर्तन केल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि नागपूर प्रभारी चंद्रकांत हंडोरे आणि निवडणूक निरीक्षक रणजीत कांबळे यांनी सादर केल्यावरुन गज्जू यादव यांना पक्षातून निलंबित करण्याचे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या :

नाना पटोले फडणवीसांच्या विरोधात नागपूर दक्षिण-पश्चिममधून शड्डू ठोकणार? आढावा बैठकीत पटोलेंचं मोठं विधान

नागपूर जिल्हा काँग्रेस महासचिवांचं पक्षातून निलंबन, पक्षशिस्त मोडल्याने नाना पटोलेंची कारवाई

(Nagpur District Congress Mukul Wasnik supporter Gajju Yadav expelled from Party accuses on Rajendra Mulak)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें