प्रफुल्ल पटेलांच्या उपस्थितीत नाना पटोलेंचा कट्टर समर्थक राष्ट्रवादीत जाणार

काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे कट्टर समर्थक प्रशांत पवार आज (16 ऑगस्ट) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत (Nana Patole Supporter join NCP in Nagpur).

प्रफुल्ल पटेलांच्या उपस्थितीत नाना पटोलेंचा कट्टर समर्थक राष्ट्रवादीत जाणार
Follow us
| Updated on: Aug 16, 2020 | 9:23 AM

नागपूर : काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे कट्टर समर्थक प्रशांत पवार आज (16 ऑगस्ट) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत (Nana Patole Supporter join NCP in Nagpur). प्रशांत पवार ‘जय जवान जय किसान’ संघटनेचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशांत पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. प्रशांत पवार मुळचे भंडारा जिल्ह्यातील आहेत. या पक्षप्रवेशामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने राज्यात एकत्रित येऊन महाविकासआघाडी स्थापन केली आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार काम करत आहेत. मात्र मित्रपक्षातील नेत्यांना पक्ष प्रवेश दिल्यावरुन याआधीही आघाडीत तणाव निर्माण झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या नेत्याचा राष्ट्रवादीत होणार हा प्रवेश राज्याच्या राजकारणावर काय परिणाम करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील सुप्त राजकीय संघर्षाविषयी नागपूरमध्ये जोरदार चर्चा विषय ठरत आहे. या पक्षप्रवेशातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांना शह दिल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

दरम्यान, याआधी पारनेर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमचे नगरसेवक परत पाठवा, असा निरोप पाठवला होता.

पारनेरमध्ये नेमकं काय झाले?

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीत शिवसेनेला धक्का बसला. पारनेरच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पारनेरचे आमदार नीलेश लंके हेदेखील उपस्थित होते. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे अशी राज्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांची नावं आहेत. त्यांनी 4 जुलै रोजी शिवसेनेला रामराम ठोकत बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर शिवसेनेने देखील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या रणनीतीचा वचपा काढत कल्याणमध्ये नवी राजकीय खेळी केली. यानुसार शिवसेनेनं कल्याण पंचायत समितीमध्ये थेट भाजपशी हातमिळवणी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला.

हेही वाचा :

सत्ता अबाधित राखायची असेल तर सेनेचे नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना थेट निरोप

शिवसेनेला धक्का, पाच नगरसेवकांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

पारनेरमधील फोडाफोडीनंतर शिवसेनेने ‘करुन दाखवले’, राष्ट्रवादीला कल्याणमध्ये दणका

Nana Patole Supporter join NCP in Nagpur

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.