तीन वेळा आमदारकी, अशोक चव्हाणांकडून तगड्या नेत्याला नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्षपद

तीन वेळा आमदारकी, अशोक चव्हाणांकडून तगड्या नेत्याला नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्षपद
वसंतराव चव्हाण, अशोक चव्हाण

वसंतराव चव्हाण हे आतापर्यंत तीन वेळा आमदार राहिलेले तगडे नेते म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. (Nanded District Bank President Vasantrao Chavan)

अनिश बेंद्रे

|

Apr 16, 2021 | 3:53 PM

नांदेड : नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी (Nanded District Bank) माजी आमदार वसंतराव चव्हाण (Vasantrao Chavan) यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा बँकेत येऊन काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण  (Ashok Chavan) यांनी वसंतराव चव्हाण यांच्याकडे ही सूत्रे सोपवली आहेत. (Nanded District Bank President Vasantrao Chavan chosen by Ashok Chavan)

कोण आहेत वसंतराव चव्हाण?

वसंतराव चव्हाण हे आतापर्यंत तीन वेळा आमदार राहिलेले तगडे नेते म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. ग्रामीण मातीशी नाळ असलेले नेते म्हणून वसंतराव चव्हाण परिचित आहेत. अध्यक्ष पदाच्या रुपाने नांदेडच्या बँकेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे वसंतराव यांनी यावेळी सांगितले.

नांदेड जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हरिहरराव भोसीकर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारत कामाला सुरुवात केली.

काय आहे निकाल?

नांदेड जिल्हा बँकेवर अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने झेंडा फडकवला. चार एप्रिलला झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलला निर्विवाद बहुमत प्राप्त झालं. 21 पैकी 17 जागांवर यश मिळवत अशोक चव्हाणांनी परिवर्तन घडवले. तर सत्ताधारी भाजपला चारच जागांवर समाधान मानावं लागलं. भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय झाला असला, तरी भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडाला.

महाविकास आघाडीतील काँग्रेस 12, शिवसेना 1, तर राष्ट्रवादी 4 जागांवर विजयी झाली. यापैकी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर तर भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर हे आधीच बिनविरोध निवडून आले होते. (Nanded District Bank President Vasantrao Chavan)

चिखलीकर जिंकले, पण पॅनल पराभूत

लोहा मतदारसंघातून भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर विजयी झाले, तर कंधार मतदारसंघातून त्यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनीही बाजी मारली. अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आमनेसामने आल्याने दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र यावेळी चव्हाणांनी बाजी मारत लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढला.

दुसरीकडे, भाजप नेते बापूसाहेब गोरठेकर यांच्या उमरी मतदारसंघात भाजप उमेदवाराने अवघ्या तीन मतांनी निसटता विजय मिळवला. बिलोली मतदारसंघातून भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर बिनविरोध विजयी झाले होते.

संबंधित बातम्या :

नांदेड जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा, अशोक चव्हाणांनी परिवर्तन घडवले

नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा धुव्वा, अशोक चव्हाण म्हणतात…

(Nanded District Bank President Vasantrao Chavan chosen by Ashok Chavan)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें