नांदेड जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा, अशोक चव्हाणांनी परिवर्तन घडवले

भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय झाला असला, तरी भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडाला ( Nanded District Bank Election Result)

नांदेड जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा, अशोक चव्हाणांनी परिवर्तन घडवले
अशोक चव्हाणांकडून भाजपच्या पॅनेलचा धुव्वा

नांदेड : नांदेड जिल्हा बँकेवर (Nanded District Bank Election Result) काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने झेंडा फडकवला. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलला निर्विवाद बहुमत प्राप्त झालं. 21 पैकी 17 जागांवर यश मिळवत अशोक चव्हाणांनी परिवर्तन घडवले. तर सत्ताधारी भाजपला चारच जागांवर समाधान मानावं लागलं. भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय झाला असला, तरी भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडाला. (Nanded District Bank Election Result Congress Ashok Chavan led Maha Vikas Aghadi won against BJP Pratap Patil Chikhalikar)

महाविकास आघाडीतील काँग्रेस 12, शिवसेना 1, तर राष्ट्रवादी 4 जागांवर विजयी झाली. यापैकी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर तर भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर हे आधीच बिनविरोध निवडून आले होते.

चिखलीकर जिंकले, पण पॅनल पराभूत

लोहा मतदारसंघातून भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर विजयी झाले, तर कंधार मतदारसंघातून त्यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनीही बाजी मारली. अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आमनेसामने आल्याने दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र यावेळी चव्हाणांनी बाजी मारत लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढला.

दुसरीकडे, भाजप नेते बापूसाहेब गोरठेकर यांच्या उमरी मतदारसंघात भाजप उमेदवाराने अवघ्या तीन मतांनी निसटता विजय मिळवला. बिलोली मतदारसंघातून भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर बिनविरोध विजयी झाले होते.

गोरठेकरांच्या मतदारसंघात निसटता विजय

भाजप नेते बापूसाहेब (श्रीनिवास) गोरठेकर (Bapusaheb Gorthekar) यांचे कट्टर समर्थक राहिलेल्या कवळे पितापुत्रांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कवळे गुरुजी या नावाने जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले मारोती कवळे यांचे पुत्र संदीप उमरी मतदारसंघातून नांदेड जिल्हा बँकेच्या रिंगणात उतरले होते.

भाजप नेते बापूसाहेब गोरठेकर यांची उमरी तालुक्यात मजबूत पकड आहे. परंतु मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या पाठिंब्यावर उमरीत भाजपचा धुव्वा उडवण्याचा निर्धार कवळेंनी व्यक्त केला होता. परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही. याआधी विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांनी गोरठेकरांना पराभवाची धूळ चारली होती. मात्र गोरठेकर आपल्या उमेदवाराच्या माध्यमातून विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढला.

नांदेड जिल्हा बँक निकाल

1. मुदखेड एकूण मतदान – 35

1) गोविंद नागेलीकर (काँग्रेस) -18

2) गांधीजी पवार (भाजप) -17

01 मताने गोविंद नागेलीकर (काँग्रेस) विजयी

2. अर्धापुर एकूण मतदान – 24

1) बाबुराव कदम कोंढेकर (काँग्रेस) -23

2) डॉ. लक्ष्मणराव इंगोले (भाजप)- 01

बाबुराव कदम (काँग्रेस) 23 मतांनी विजयी

3. कंधार एकूण मतदान – 24

1) प्रवीण पाटील चिखलीकर (भाजपा) – 16

2) पांडागळे माधवराव (काँग्रेस) – 08

प्रवीण पाटील (भाजप) 8 मतांनी विजयी

4. लोहा एकूण मतदान – 48

1) प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजपा) – 42

2) लताबाई सूर्यवंशी (काँग्रेस) – 06

प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजप) 38 मतांनी विजयी

5. बिलोली – भास्करराव पाटील खतगावकर (भाजपा) बिनविरोध विजयी

6. नायगाव एकूण मतदान- 50

1) वसंतराव पाटील चव्हाण (काँग्रेस) – 28

2) गंगाधरराव कुंटुरकर (भाजप) – 22

वसंतराव चव्हाण (काँग्रेस) 06 मतांनी विजयी

7. देगलूर एकूण मतदान – 53

1) देशमुख विजयसिंग (कॉंग्रेस) – 34

2) गोदावरीबाई सुगावे (भाजपा) – 29

देशमुख विजयसिंग (कॉंग्रेस) – 05 मतांनी विजयी

8. धर्माबाद एकूण मतदान -05

1) कदम श्याम (काँग्रेस) – 04

2) मिरझा गफ्फार बेग (राष्ट्रवादी) – 01

कदम श्याम (काँग्रेस) 3 मताने विजयी

9. हदगाव – नागेश पाटील अष्टीकर (शिवसेना) बिनविरोध विजयी

10. भोकर – बाळासाहेब किशनराव पाटील (काँग्रेस) बिनविरोध विजयी

11. उमरी एकूण मतदान -26

1) कवळे संदीप (कॉंग्रेस) – 21

2) कैलास गोरठेकर (भाजपा) – 24

3) विनोद शिंदे अपक्ष -01

कैलास गोरठेकर (भाजपा) 03 मतांनी विजयी

12. मुखेड एकूण मतदान -33

1) हणमंतराव पाटील बेटमोगरेकर (काँग्रेस) – 17

2) राठोड गंगाधर गोविंदराव (भाजपा) – 16

हाणमंत पाटील बेटमोगरेकर (काँग्रेस) 01 मताने विजयी

संबंधित बातम्या :

सकाळी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, दुपारी खासदार चिखलीकरांची नांदेड जिल्हा बँकेसाठी उमेदवारी

आधी अशोक चव्हाणांनी धूळ चारली, आता गोरठेकरांना कट्टर समर्थकांचं काँग्रेसमधून आव्हान

(Nanded District Bank Election Result Congress Ashok Chavan led Maha Vikas Aghadi won against BJP Pratap Patil Chikhalikar)

Published On - 3:35 pm, Sun, 4 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI