AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, दुपारी खासदार चिखलीकरांची नांदेड जिल्हा बँकेसाठी उमेदवारी

नांदेड जिल्हा बँकेच्या मतदान यादीतून चिखलीकर यांचे नाव हटवावे, अशी मागणी विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती (Pratap Patil Chikhalikar Nanded Bank)

सकाळी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, दुपारी खासदार चिखलीकरांची नांदेड जिल्हा बँकेसाठी उमेदवारी
भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर
| Updated on: Mar 02, 2021 | 4:04 PM
Share

नांदेड : नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) सर्व प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. या आदेशानंतर खासदार चिखलीकर यांनी बँकेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (BJP MP Pratap Patil Chikhalikar candidature for Nanded District Bank Election)

सकाळी दिलासा दुपारी अर्ज

नांदेड जिल्हा बँकेच्या मतदान यादीतून चिखलीकर यांचे नाव हटवावे, अशी मागणी विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याबाबत आज सकाळी चिखलीकर यांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून चिखलीकर यांनी दुपारी आपला उमेदवारी अर्ज भरला.

जिल्हा बँक निवडणुकीत चुरस

या निवडणुकीत जे सोबत येतील त्यांना घेऊन आपण मैदानात उतरणार असल्याचे चिखलीकर यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आता नांदेडच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने चुरस निर्माण होणार आहे. न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास असल्याची प्रतिक्रिया खासदार चिखलीकर यांनी दिली.

कोण आहेत प्रताप पाटील चिखलीकर?

प्रताप पाटील चिखलीकर यांनी 2012 मध्ये काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ऑगस्ट 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. तर 2019 मधील लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

शंकरराव चव्हाणांचे निकटवर्तीय

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी पराभव केला होता. अशोक चव्हाण यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे चिखलीकर हे निकटवर्तीय होते, मात्र अशोक चव्हाणांचे ते विरोधक झाले. (BJP MP Pratap Patil Chikhalikar candidature for Nanded District Bank Election)

अशोक चव्हाणांना धक्का

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तत्कालीन खासदार अशोक चव्हाणांना पराभवाची धूळ चारली होती. लोकसभेला पराभूत झाल्यानंतर अशोक चव्हाण भोकर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. विधानसभेतही पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून चव्हाण जिद्दीला पेटले होते. विधानसभेला अशोक चव्हाणांनी विरोधकांना आस्मान दाखवले.

संबंधित बातम्या :

आतापर्यंत चार पक्ष बदलले, आता जिना यहां, मरना यहां : चिखलीकर

मद्यधुंद ट्रकचालक थेट खासदार प्रताप चिखलीकरांच्या कारच्या दिशेने, कारचालकामुळे अपघात टळला

(BJP MP Pratap Patil Chikhalikar candidature for Nanded District Bank Election)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.