‘प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ देत’, वंचितच्या कार्यकर्त्यांचा प्राचीन शिवमंदिरात दुग्धाभिषेक

'प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ देत', वंचितच्या कार्यकर्त्यांचा प्राचीन शिवमंदिरात दुग्धाभिषेक
नांदेडच्या कंधारमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रकृतीला लवकर आराम मिळू देत म्हणून महादेवाला साकडे घातले.

नांदेडच्या कंधारमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रकृतीला लवकर आराम मिळू देत म्हणून दुग्धाभिषेक करुन महादेवाला साकडे घातले. (Nanded kandhar VBA karyakarta pray For Prakash Ambedkar health)

राजीव गिरी

| Edited By: Akshay Adhav

Jul 11, 2021 | 9:29 AM

नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीला आराम मिळावा, यासाठी राज्यभरातून वंचितचे कार्यकर्ते प्रार्थना करत आहे, दुवा करत आहेत… नांदेडच्या कंधारमध्ये देखील वंचितच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रकृतीला लवकर आराम मिळू देत म्हणून महादेवाला साकडं घातलं. (Nanded kandhar VBA karyakarta pray For Prakash Ambedkar health)

दुग्धाभिषेक करत बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना

कंधारच्या प्राचीन शिवमंदिरात मंचच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक करत बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील केली आहे यावेळी लोहा आणि कंधार तालुक्यातील वंचित आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते हजर होते.

वंचितच्या लढवय्या नेत्याला, ज्याचं वंचितांना सत्तेच्या दारात पोहोचवायचं स्वप्न आहे, अशा बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर बाळासाहेबांनी तोच जोश घेऊन यावा, अशा भावना वंचितचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली आहे. त्यामुळेच ते तीन महिने विश्रांती घेणार असून या दरम्यान कोणत्याही राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार नाहीत.

आंबेडकरांची प्रकृती स्थिर

प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीविषयी दररोज मेडिकल बुलेटीन जारी केलं जातंय. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्‍टरांनी सांगितले आहं. ते आता व्हिडीओ कॉलवरुन त्यांच्या कुटुंबियांशी बोलत आहेत. कार्यकर्त्यांनी काळजी करु नये, त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि झटपट सावरतीय देखील आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाची सूत्र रेखा ठाकूर यांच्याकडे देण्यात आलेली आहेत.

दररोज मेडिकल बुलेटिन

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही, असे डॉक्टरानी कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल. त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरून रोज देण्यात येईल, असं रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे.

(Nanded kandhar VBA karyakarta pray For Prakash Ambedkar health)

हे ही वाचा :

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांवर बायपास सर्जरी, तीन महिने विश्रांती घेणार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें