VIDEO : दादा माझ्या मुलाला वाचवा, नारायण राणेंची चंद्रकांत पाटलांना साद

स्त्याच्या दुरावस्थेमुळे आमदार नितेश राणे यांनी उपअभियंते प्रशांत शेडेकर यांना धक्काबुक्की करत चिखलाची आंघोळ घातली होती. याप्रकरणी खासदार नारायण राणे यांनी मला फोन केला आणि दादा माझ्या मुलाला वाचवा" अशी साद घातल्याची माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.

VIDEO : दादा माझ्या मुलाला वाचवा, नारायण राणेंची चंद्रकांत पाटलांना साद
Follow us
| Updated on: Jul 08, 2019 | 2:20 PM

पुणे : रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आमदार नितेश राणे यांनी उपअभियंते प्रशांत शेडेकर यांना धक्काबुक्की करत चिखलाची आंघोळ घातली होती. याप्रकरणी पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी शेडेकर यांच्या कुटुंबियांना भेट दिली. त्यावेळी “खासदार नारायण राणे यांनी मला फोन केला आणि दादा माझ्या मुलाला वाचवा अशी साद घातली आहे. पण मी त्यांना नकार देत नितेश राणेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर खुनाच्या प्रयत्नांचे कलम लावा असे आदेश दिलेत” असे चंद्रकांत पाटलांनी सांगितले.

गुरुवारी (4 जुलै) रोजी मुंबई गोवा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे उपअभियंते प्रशांत शेडेकर यांना धक्काबुक्की करत चिखलाची आंघोळ घातली होती. या प्रकरणी  चंद्रकांत पाटील यांनी प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी शेडेकर यांच्या आईला अश्रू अनावर झाले. तसेच शेडेकर यांच्या कुटुंबाने यात आमच्या मुलाचा काय दोष, आमच्या मुलाच्या प्रामाणिकपणाची शिक्षा का देता असे प्रश्न चद्रकांत पाटलांना विचारले.

मला नारायण राणेंनी फोन केला होता. त्यावेळी त्यांनी दादा माझ्या मुलाला वाचवा असे सांगितले. पण मी त्यासाठी नकार देत नितेश राणेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर खुनाच्या प्रयत्नांचे कलम लावा असे आदेश दिलेत असे सांगितले.

तसेच त्यांनी “कर्तव्यदक्षपणे सेवा देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार कायम उभे आहे. या प्रकरणी आरोपींना नक्की शिक्षा होईल असेही आश्वासन चंद्रकांत पाटलांनी शेडेकर यांच्या कुटुंबाला दिले. तसेच शेडेकर यांना पोलीस सरंक्षण दिलं असून तुमच्या कुटुंबाला हवी ती मदत करु”, असेही चंद्रकांत पाटलांनी यावेळी सांगितले.

नेमकं प्रकरण काय आहे?

गेल्या काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक पावित्रा घेत उपअभियंत्याला धक्काबुक्की केली.  आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना पुलाला बांधण्याच्या प्रयत्न करुन, थेट हायवेवरील चिखलाने आंघोळ घातली.  नितेश राणेंनी शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहिली.

मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, जागोजागी पसरलेले खडीचे साम्राज्य, तसेच सातत्याने अपघात होत असतात. त्यामुळे नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात जाऊन उप अभियंता प्रकाश शेडेकर यांची भेट घेतली. त्यानंतर आक्रमक झालेल्या राणेंनी शेडेकर यांना हाताला धरुन महामार्गाची जबरदस्तीने पाहणी करायला लावली. पाहणी झाल्यानंतर त्यांनी शेडेकर यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या अंगावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. एव्हढंच नव्हे तर त्यांना महामार्गाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

नितेश राणेंना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

उपअभियंत्यावर चिखलफेक करणारे आमदार नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांना कोठडी 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात  आली होती. कणकवलीतील दिवाणी न्यायालयाने हा निर्णय दिला होता.  या दरम्यान नारायण राणे पोलीस कोठडीत असलेला पुत्र आणि आमदार नितेश राणे यांना भेटण्यासाठी सिंधुदुर्गात दाखल झाले होते.

संबंधित बातम्या : 

नारायण राणे दिल्लीवरुन सिंधुदुर्गात, नितेश राणेंची कोठडीत भेट

नितेश तू चुकलास, मी माफी मागतो : नारायण राणे

VIDEO : नितेश राणेंकडून उपअभियंत्याला पूलाला बांधून चिखलाची अंघोळ 

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.