ठाकरे सरकारने चेष्टा लावलीय, लोकल सुरु करुन काय करणार? राष्ट्रपती राजवट मागणीवर ठाम : राणे

लॉकडाऊन जसा हाताळला गेला पाहिजे, तसा तो होत नाही. लोकल सेवा सुरु करुन काय करणार? असा सवाल उपस्थित करत संक्रमण आणखी वाढण्याची भीतीही नारायण राणे यांनी व्यक्त केली. (Narayan Rane Exclusive Interview on Corona Lockdown Cyclone Nisarga)

ठाकरे सरकारने चेष्टा लावलीय, लोकल सुरु करुन काय करणार? राष्ट्रपती राजवट मागणीवर ठाम : राणे
Follow us
| Updated on: Jun 11, 2020 | 1:28 PM

सिंधुदुर्ग : फक्त फेरफटका मारुन होत नाही, राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीचा फेरविचार करावा, अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ठाकरे सरकारने चेष्टा लावली आहे, लोकल सुरु करुन काय करणार? असं विचारत राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं राणे म्हणाले. (Narayan Rane Exclusive Interview on Corona Lockdown Cyclone Nisarga)

“निसर्ग चक्रीवादळ झालं, तेव्हा मी तिथेच होतो. मी नुकसान पाहिलं आहे. राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेली मदत पुरेशी नाही. रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना झालेली मदत तुटपुंजी आहे. आर्थिक स्थिती वाईट असली तरी सरकारने मदतीचा फेरविचार करावा. लोकांना जास्तीत जास्त मदत करावी” अशी मागणी नारायण राणे यांनी केली.

“सिंधुदुर्गाला 25 कोटीची मदत दिली, पण यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विविध योजनांतील 200 कोटी परत घेतले. ठाकरे सरकारने चेष्टा लावली आहे. लोकांच्या तोंडाला पाने पुसू नका. मच्छीमारांचं नुकसान झालं आहे. फक्त फेरफटका मारुन काही होत नाही” असा प्रहारही राणेंनी केला. केंद्राकडे आम्ही भरीव मदतीसाठी मागणी करू, असंही ते म्हणाले.

हेही वाचा : ठाकरे सरकारला नारळ द्या, राष्ट्रपती राजवट लागू करा, राणेंची राज्यपालांकडे मागणी

लॉकडाऊन जसा हाताळला गेला पाहिजे, तसा तो होत नाही. लोकल सेवा सुरु करुन काय करणार? असा सवाल उपस्थित करत संक्रमण आणखी वाढण्याची भीतीही नारायण राणे यांनी व्यक्त केली.

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाही. सरकारने कमी करुन दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते उघडे पडतील. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीवर आपण ठाम असल्याचा पुनरुच्चार नारायण राणे यांनी केला.

सरकारला खर्च करायचा असेल, तर पुरवण्या मागण्या मान्य करुन घ्यायला पाहिजेत. त्यासाठी एक दिवासाचं अधिवेशन बोलावायला हवं, अशी मागणी नारायण राणे यांनी केली. विरोधी पक्षाला सामोरं जायला जी ताकद लागते, ती सत्तारुढ पक्षामध्ये नसल्याची टीकाही नारायण राणे यांनी केली.

(Narayan Rane Exclusive Interview on Corona Lockdown Cyclone Nisarga)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.