राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो; राणेंचा राऊतांना टोला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचा फोटो तीन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यावरून अनेक राजकीय अंदाज बांधले गेले. मात्र, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी या फोटोची खिल्ली उडवली आहे. (Narayan Rane)

राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो; राणेंचा राऊतांना टोला
narayan rane

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचा फोटो तीन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यावरून अनेक राजकीय अंदाज बांधले गेले. मात्र, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी या फोटोची खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात. तो पक्ष रसातळाला जातो, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. (Narayan Rane slams over rahul gandhi and sanjay raut photo)

नारायण राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. काँग्रेस आता कुठे आहे का? ती संपत चालली आहे. राहुल गांधींना आता कुणाचा तरी आधार पाहिजे. जेव्हा जेव्हा राहुल गांधी कुणाच्या खांद्यावर हात ठेवतात, तेव्हा तेव्हा तो पक्ष रसातळाला जातो हा इतिहास आहे, असं राणे म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा नाही

दैनिक ‘सामना’मध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या बातम्या येत आहेत. त्यावरूनही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी काहीच काम केलं नाही. त्यामुळे ‘सामना’कडे छापण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे ते भाजपबद्दलच्या बातम्या देत असतात. संजय राऊतांना तशी वाईट सवयच आहे. लोकांना सांगण्यासाठी सामनाकडे काहीच नाही, असं सांगतानाच पक्षाध्यक्ष बदलण्याबाबत पक्षात कोणतीही चर्चा नाही. यात कुठलं राजकारण नाही. बदला बदली नाही किंवा मोर्चेबांधणीही नाही, असं राणेंनी स्पष्ट केलं.

राज्याचे वाभाडे काढणार

सव्वा महिना झाला. राज्य सरकारचे वाभाडे काढले नाही. त्यामुळे मी 16 तारखेनंतर महाराष्ट्रात येणार आहे. राज्य अधोगतीकडे चालंलय. त्यामुळे लोकांना जागृत करणार आहे, असं सांगतानाच परत चिपळूणला जाणार असून पूरग्रस्तांशी चर्चा करणार आहे. मी गेल्या गेल्या केंद्र सरकारने 700 कोटी रुपये दिले आहेत. राज्य सरकारने केवळ दहा हजार रुपये दिले. लोकांनी ते पिंपात टाकले. आता ते फुगून बाहेर येतील, अशी टीका त्यांनी केली.

केंद्राचे निर्णय जनतेला सांगणार

केंद्र सरकारने जे चांगले निर्णय घेतले आहेत ते कसे जनतेपर्यंत घेऊन जायचे याची एक रूपरेषा तयार करत आहोत. याची माहिती जनतेला देणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. (Narayan Rane slams over rahul gandhi and sanjay raut photo)

संबंधित बातम्या:

Maharashtra Corona Update : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार, मुख्यमंत्री काय बोलणार?

..तर सत्ताधारी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार, खासदार इम्तियाज जलील यांचा इशारा, कारण काय?

चंद्रकांत पाटलांना बदलण्याची चर्चा का होतेय?; खरंच बदललं जाणार का?

(Narayan Rane slams over rahul gandhi and sanjay raut photo)

Published On - 4:10 pm, Sun, 8 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI