VIDEO: फडणवीस मला कंटाळले म्हणून की काय त्यांनी मला दिल्लीत पाठवलं, राणेंना नेमकं काय म्हणायचंय?

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या पहिल्याच दिवशी जोरदार टोलेबाजी केली. पहिल्यांदाच मी मुंबईपासून दीड महिना दूर राहिलो. (narayan rane told why devendra fadnavis sent him delhi?)

VIDEO: फडणवीस मला कंटाळले म्हणून की काय त्यांनी मला दिल्लीत पाठवलं, राणेंना नेमकं काय म्हणायचंय?
narayan rane
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 3:54 PM

मुंबई: केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या पहिल्याच दिवशी जोरदार टोलेबाजी केली. पहिल्यांदाच मी मुंबईपासून दीड महिना दूर राहिलो. नाही तर पंधरा दिवसाच्यावर मुंबईपासून कधी दूर राहिलो नाही, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस मला कंटाळले होते की काय म्हणून मला दिल्लीत पाठवलं, असा मिश्किल टोला नारायण राणे यांनी लगावला. राणेंच्या या मिश्किल टोलेबाजीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (narayan rane told why devendra fadnavis sent him delhi?)

नारायण राणे यांची काल मुंबई विमानतळापासून जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली. यावेळी झालेल्या छोटेखानी सभेत त्यांनी ही मिश्किल टोलेबाजी केली. दीड महिन्यानंतर तुम्हा सगळ्यांना पाहतो. आयुष्यात पहिल्यांदाच मुंबईपासून दीड महिना दूर राहिलो. नाही तर पंधरा दिवसापेक्षा अधिक काळ बाहेर राहिलो नव्हतो. देवेंद्र फडणवीस कंटाळले होते का मला की त्यांनी मला दिल्लीला पाठवलं. त्यांनी सद्भावनेने मला दिल्लीत पाठवलं. प्रेमापोटी त्यांनी पाठवलं. मी काम करू शकेल या विश्वासापोटी त्यांनी मला दिल्लीत पाठवलं, असं राणे म्हणाले.

अन् दिल्लीत आल्याची जाणीव झाली

फडणवीस यांनी मला ज्या उद्देशाने मोदींच्या मंत्रिमंडळात पाठवलं. त्या मोदींना ताकद देणं, पाठबळ देणं हे माझं काम राहील. मोदींना सहकार्य करूनच काम करणार आहे, असं सांगतानाच मंत्रिमंडळात सहभागी झाल्यावर एक वेगळा अनुभव घेता आला. मोदींच्या नेतृत्वात कॅबिनेटमध्ये बसताना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालो असं वाटलं नाही. कॅबिनेटच्या बैठकीला थोडा वेळ बसलो तेव्हा कुठे देवेंद्र दिसेल. कुठे प्रवीण दरेकर दिसेल, कुठे आशिष दिसेल असं वाटत होतं. पण यातलं कोणी दिसलं नाही. त्यामुळे आपण दिल्लीत आल्याची जाणीव झाली, असं भावूक उद्गारही त्यांनी काढलं.

रण तापेल, पण फायदा नाही

नारायण राणे यांनी मिश्किलपणे केलेल्या या वक्तव्यावरही राजकीय कयास लावले जात आहेत. राणे यांना मंत्रिपद दिल्याने महाराष्ट्रातील राजकारणारव फारसा प्रभाव पडणार नाही. राज्यात सत्तांतर होईल अशी परिस्थितीही नाही. फक्त शिवसेनेवर वचक ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. महापालिका निवडणुकीत शिवसेनेवर टीका करण्यासाठी भाजपला फायरब्रँड नेत्याची आवश्यकता होती. राणेंच्या रुपाने ती भरून निघेल. त्यामुळे महापालिका निवडणुकीचं रण तापेल. परंतु, राणेंमुळे भाजपची व्होट बँक वाढेल असं वाटत नाही, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक ज्ञानेश्वर खंदारे यांनी सांगितलं. राणेंनी फडणवीसांबाबत केलेलं विधान हे मुद्दाम केलेलं नाही. मिश्किल विधान करण्याच्या ओघात ते बोलून गेले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. (narayan rane told why devendra fadnavis sent him delhi?)

संबंधित बातम्या:

राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला, आता अजित पवारांचं ‘दादा स्टाईल’ उत्तर

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती स्थळावर नारायण राणेंनी काय आशीर्वाद मागितला?; राणेंनी केला मोठा खुलासा

बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, मी पुत्र असतो तर त्यांना इथे येऊच दिलं नसतं; राणेंचा हल्लाबोल

(narayan rane told why devendra fadnavis sent him delhi?)

Non Stop LIVE Update
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.