दिशा सालियानची बलात्कारानंतर हत्या, सगळं बोललो तर परवडणार नाही : नारायण राणे

सुशांतसिह राजपूतची हत्या आणि दिशा सालियानची बलात्कार करुन हत्या झाली. त्याचे आरोपी मिळाले नाही. नारायण राणेच्या पाठीमागे लागू नका. नाहीतर मी आता थोडं बोलतोय. नाहीतर सगळं बोलावं लागेल ते परवडणारं नाही, अशा शब्दात राणेंनी शिवसेनेला एकप्रकारे दम भरलाय.

दिशा सालियानची बलात्कारानंतर हत्या, सगळं बोललो तर परवडणार नाही : नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे


रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. दोन दिवस खंड पडल्यानंतर आता पुन्हा एकदा राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. त्यावेळी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दिलाय. सुशांतसिह राजपूतची हत्या आणि दिशा सालियानची बलात्कार करुन हत्या झाली. त्याचे आरोपी मिळाले नाही. नारायण राणेच्या पाठीमागे लागू नका. नाहीतर मी आता थोडं बोलतोय. नाहीतर सगळं बोलावं लागेल ते परवडणारं नाही, अशा शब्दात राणेंनी शिवसेनेला एकप्रकारे दम भरलाय. (Narayan Rane warns Mahavikas Aghadi Government and Shivsena)

मी कुठलाही गुन्हा केला नाही. आपण सत्तेत आहोत, ती सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. काही हरकत नाही. आम्ही काही कायम विरोधी पक्षात राहण्यासाठी आलो नाही. भविष्यात आम्हीही सत्तेत येऊ. त्यामुळे अधिकारी, पोलिसांनी कायद्यात राहून काम करावं. कायद्याच्या बाहेर जाऊन काम कराल तर तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा राणेंनी अधिकारी आणि पोलिसांना दिला आहे. जर मी क्रिमिनल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? इतके दिवस मंत्री कसा राहिलो? असा सवालही राणेंनी विरोधकांना केलाय. आता मोदींच्या काळात केंद्रीय मंत्री झालो. पण पहिली पदं यांनीच दिली ना. तेव्हा नव्हतं का कुणी विरोध करायला? असंही राणे म्हणालेत. साहेबांना जेव्हा दहशतवाद्यांकडून धोका होता, तेव्हा त्यांना मातोश्री सोडायला सांगितलं तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही, असा टोला राणेंनी लगावलाय.

कोरोनाची बंधनं फक्त नारायण राणेंसाठीच आहेत का?

कोरोना काळात महाराष्ट्रात 1 लाख 57 हजार नागरिकांचा मृत्यू झाला. देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. कोरोनाची बंधनं फक्त नारायण राणेंसाठीच आहेत का? आमच्या देशात आम्ही राहतो. तेव्हा आम्हाला आमच्या देशात अशी मनाई का? कोरोना मोठ्या प्रमाणात होता तेव्हा अशी कुठलीही कारवाई झाली नाही, असा आरोपही राणेंनी केलाय. माझ्या घराजवळ आलेल्या चिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला. पोलिसांनी त्यांना चांगलंच चोपलं, असा टोलाही राणी लगावला आहे.

‘कोकणात औद्योगिकीकरणासाठी काम करणार’

जनतेचे प्रश्न जाणून घ्यावेत, भविष्यात ते सोडवण्यासाठी मंत्रीपद आहे. देशात 80 टक्के कारखाने, उद्योगधंदे माझ्याजवळ आहे. कोकणात औद्योगिकीकरणासाठी मी काम करणार आहे. मी यानंतर कोकणात येताना अधिकाऱ्यांना घेऊन येईन. उद्योगाचं 200 कोटीचं प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची माहितीही राणे यांनी यावेळी दिली आहे.

संबंधित बातम्या :

वरुण सरदेसाई आता परत आला तर माघारी जाणार नाही, नारायण राणेंचा रोखठोक इशारा

उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या असहिष्णुतेचे जनक, आशिष शेलार यांचा घणाघाती हल्ला

Narayan Rane warns Mahavikas Aghadi Government and Shivsena

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI