किती वेळ बोलतो मी मर्द आहे, एकदा तपासावेच लागेल; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

उद्धव ठाकरे नेहमी आपल्या भाषणात मी मर्द आहे, मी मर्द आहे असं म्हणतात. पण एक तरी मर्दासारखा काम केलं आहे का? असा सवाल उपस्थित करत सगळी काम दुसऱ्याकडून करून घेता अशी टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

किती वेळ बोलतो मी मर्द आहे, एकदा तपासावेच लागेल; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
वनिता कांबळे

|

Sep 22, 2022 | 6:02 PM

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : भाजप नेते आणि केंद्रीय नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यावर जहरी टीका केली आहे. किती वेळ बोलतो मी मर्द आहे, एकदा तपासावेच लागेल असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे नेहमी आपल्या भाषणात मी मर्द आहे, मी मर्द आहे असं म्हणतात. पण एक तरी मर्दासारखा काम केलं आहे का? असा सवाल उपस्थित करत सगळी काम दुसऱ्याकडून करून घेता अशी टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

उद्धव ठाकरे चार खासदार, दहा आमदार निवडून आणू शकत नाही. संजय राऊतांसह उद्धव ठाकरे देखील आत जाणार असा गर्भित इशारा नारायण रोणींनी दिला.

आदिलशाह आणि अमित शाह यातील फरक कळत नाही ? ते लोकं आपल्यावर चालून आले. गृहमंत्री देशाचे आहेत. त्यांना गिधाड बोलताना लाज वाटली नाही का ? पण लांडगा उपकाराची जाणीव ठेवत नाही असा घणाघात राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला.

बाप पळवणारी टोळी आलेय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. या टीकेला देखील राणेंनी उत्तर दिलेय. एकनाथ शिंदे आणि त्यांसह गेलेले 40 आमदार बाळासाहेब यांची आठवण काढतात. साहेब सन्मान करायचे असे ते सांगतात. पैशासाठी, सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी गद्दारी केली.

उद्धव यांनी मुंबई महापालिका धुतली. मुंबई मधील नागरिकांचे यांनी शोषण केलं, टक्केवारी साठी मुंबई बकाल केली असे आरोपही राणेंनी केले.

मुंबईवर गिधाडे फिरायला लागलेत असं उद्धव ठाकरे म्हणाले होते असं राणेंनी पत्रकार परिषदेत सांगीतले. कुणाला गिधाडे म्हणता. जनाची नाही तर मनाची तरी विचार करा.

उद्धव यांना तलवार धरता येते का ? आयुष्यात तलवार कधी पकडलेय का? भेट मिळालेली तलावर तरी कधी उघडून पाहिलेय का? दंगलींमध्ये कधी तलवार घेऊन बाहेर पडला का? असे प्रश्न उपस्थित करत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

मुंबईवर संकट येतं तेव्हा केंद्र सरकार महाराष्ट्राच्या मदतीला धावून येते. उद्धव ठाकरे कोथळा काढणार अशी भाषा करत आहेत. कुणाच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र फिरून दाखवा अशा इशाराच राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें