AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस नदीची दोनं टोकं’, मोदी-पवार भेटीनंतरच्या राजकीय चर्चेला मलिकांकडून पूर्णविराम!

राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा वेगळी असताना दोन्ही पक्ष एकत्र येणं शक्य नाही. या चर्चांमध्ये तथ्य नाही, असा खुलासा राष्ट्रवादी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

'भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस नदीची दोनं टोकं', मोदी-पवार भेटीनंतरच्या राजकीय चर्चेला मलिकांकडून पूर्णविराम!
नवाब मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 5:43 PM
Share

मुंबई : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही नदीची दोन टोकंआहे. जोपर्यंत पाण्याचा प्रवाह असतो तोपर्यंत दोन्ही टोकं एकत्र येत नाही. राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा वेगळी असताना दोन्ही पक्ष एकत्र येणं शक्य नाही. या चर्चांमध्ये तथ्य नाही, असा खुलासा राष्ट्रवादी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात राजधानी दिल्लीत तासभर बैठक झाल्यानंतर सुरु झालेल्या चर्चेबाबत मलिक यांनी हा खुलासा केला आहे. (BJP and NCP are the two ends of the river, Nawab Malik’s statement after Pawar and Modi meet)

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भेटीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या अटकली बांधल्या जात होत्या मात्र नवाब मलिक यांनी या अटकलींना पूर्णविराम दिला. राष्ट्रवादीचा राष्ट्रवाद आणि भाजपचा राष्ट्रवाद यांच्यात जमीन आस्मानाचं अंतर आहे. शिवाय विचारसरणी वेगळी आहे असंही नवाब मलिक म्हणाले.

‘हवामान खात्याचा अंदाज खरा ठरेल पण यांचा नाही’

सध्यस्थितीत किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर महाविकास आघाडी सरकार तयार करण्यात आलेलं आहे. ते व्यवस्थित काम करत असताना काही लोक तारीख पे तारीख देत मी पुन्हा येईन असं सांगत आहेत. हवामान खात्याने अंदाज दिल्यावर पाऊस येतो. मात्र, यांचा अंदाज खरा ठरत नाही असा टोलाही नवाब मलिक यांनी यावेळी भाजप नेत्यांना लगावलाय.

बँकिंग क्षेत्राच्या प्रश्नांबाबत शरद पवार मोदींच्या भेटीला

शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी माजी संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टोनी आणि लष्करप्रमुखही उपस्थित होते. या भेट देशाच्या संरक्षण विषयावर चर्चा झाली. दुसरीकडे नागरी सहकारी बँकांचे अधिकार कमी करुन रिझर्व्ह बँकेला जादा अधिकार देण्यात आले आहेत. त्याबाबत पंतप्रधान मोदी आणि पवार यांच्यातील बैठकीत चर्चा झाल्याचं मलिक यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आणि पवारांची भेट झाली नसल्याचंही मलिक म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांना कल्पना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या आज दिल्लीत झालेल्या बैठकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांना कल्पना होती अशी माहितीही मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. कोरोना संकटाच्या काळात ज्या अडचणी येत आहेत, त्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. लसीच्या योग्य पुरवठ्याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, भ्रम निर्माण करण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप मलिक यांनी केलाय.

संबंधित बातम्या :

सुधारित सहकार कायद्यात विसंगती, अतिउत्साहात तत्वांचा बळी नको, पवारांचं मोदींना भलंमोठं पत्र

भेटीगाठी वाढल्या, आता संजय राऊत शरद पवारांच्या घरी, दोघेही एकाच गाडीतून उपराष्ट्रपतींकडे

BJP and NCP are the two ends of the river, Nawab Malik’s statement after Pawar and Modi meet

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.