शपथ ग्रहणापूर्वी मोदी आईसमोर नतमस्तक!

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गुजरातच्या दौऱ्यावर होते. लोकसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. येत्या 30 मे रोजी ते पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी आज मोदींनी गुजरातमध्ये गांधीनगर येथे त्यांच्या राहत्या घरी जाऊन आई हीराबेन यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी मोदींचा मातृत्त्व भाव सर्वांनी अनुभवला. निवडणुकांपूर्वीही मोदींनी त्यांच्या आईचे …

शपथ ग्रहणापूर्वी मोदी आईसमोर नतमस्तक!

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गुजरातच्या दौऱ्यावर होते. लोकसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. येत्या 30 मे रोजी ते पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी आज मोदींनी गुजरातमध्ये गांधीनगर येथे त्यांच्या राहत्या घरी जाऊन आई हीराबेन यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी मोदींचा मातृत्त्व भाव सर्वांनी अनुभवला. निवडणुकांपूर्वीही मोदींनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले होते.

निवडणुकांमध्ये विजय प्राप्त केल्यानंतर आज मोदी त्यांच्या होमटाऊनला पोहोचले. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पक्षाचे इतर नेतेही त्यांच्यासोबत होते. जिंकल्यानंतरची मोदींची पहिली सभा ही गुजरातमध्ये आयोजित करण्यात आली. यावेळी अहमदाबाद विमानतळावर पोहोचताच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर मोदींनी विमानतळावरील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीला मानवंदना दिली. त्यानंतर मोदी हे खानपूरच्या पक्ष कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

त्यानंतर मोदी यांनी थेट गांधीनगर गाठत आई हीराबेन यांची भेट घेतली. यावेळी मोदींनी आईला नमस्कार करत त्यांचा आशीर्वाद घेतला. मोदी बराच वेळ त्यांच्या आईसोबत घरात होते. त्यांनी त्यांच्या आईसोबत बराच वेळ गप्पा मारल्या. त्यांच्या घराबाहेर अनेक लोकांनी मोदींची एक झलक पाहाण्यासाठी गर्दी केलेली होती. अहमदाबाद येथेही मोदींचं मोठ्या उत्साहात नागरिकांनी स्वागत केलं. त्यांना पाहाण्यासाठी अहमदाबादमध्येही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

मोदींच्या सभेतील महत्त्वाचे मुद्दे

  • सूरतमध्ये झालेल्या अग्नीतांडवावर मोदींनी दु:ख व्यक्त केलं. आम्ही पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहोत. या दु:खाच्या प्रसंगी ईश्वराने त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती द्यावी. गुजरात सरकार आपत्ती व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधांना अधिक भक्कम करण्याच्या प्रयत्नात आहे.
  • मी त्या भूमीवर परतलो आहे, जिथे मी मोठा झालो. मी एका अशा ठिकाणी आलो आहे ज्याच्यासोबत माझं जूनं नातं आहे, असं म्हणत मोदींनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
  • मी इथे गुजरातच्या लोकांच्या दर्शनासाठी आलो आहे. राज्यातील नागरिकांचा आशीर्वाद माझ्यासाठी नेहमी खास राहिला आहे, असं मोदी गुजरातवासीयांना संबोधत म्हणाले.
  • सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर मी स्वत: म्हटलं होतं की, आम्हाला 300 पेक्षा जास्त जागा येतील. तेव्हा लोकांनी माझी खिल्ली उडवली. पण, निकाल सर्वांनी पाहिला. हे ऐतिहासिक आहे. लोकांना पुन्हा एकदा एक सक्षम सरकार हवी आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
  • निवडणूक प्रचारच्या पहिल्या तीन दिवसांतच मला विश्वास झाला होता की, ही निवडणूक भाजप किंवा एनडीए नाही तर भारतीय जनता लढवत होती, असंही मोदी म्हणाले.
  • इतक्या लोकांचा विश्वास मोठी जबाबदारी घेऊन येतो. त्यामुळे इतक्या विराट विजयानंतर विनम्रता ही अत्यंत महत्त्वाची आहे, असा सल्ला मोदींनी कार्यकर्त्यांना दिला.
  • येणाऱ्या पाच वर्षांत सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवायच्या आहेत. देशाच्या विकासासाठी हे पाच वर्ष असणार आहेत. विश्व स्तरावर भारताला आणखी मोठं करायचं आहे, असंही मोदींनी कार्यकर्त्यांना सांगितलं.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *