AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशकात शिवसेनेची स्वबळाची चाचपणी, काँग्रेसचीही बैठक, मविआचं काय होणार?

शहरात आज ( 26 डिसेंबर) महाविकास आघाडीतील अटकपक्ष काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या स्वतंत्र बैठका पार पडल्या . (nashik election congress shivsena)

नाशकात शिवसेनेची स्वबळाची चाचपणी, काँग्रेसचीही बैठक, मविआचं काय होणार?
| Updated on: Dec 26, 2020 | 1:52 PM
Share

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय बैठका सुरु झाल्या आहेत. शहरात आज ( 26 डिसेंबर) महाविकास आघाडीतील अटकपक्ष असेलेल्या काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या स्वतंत्र बैठका पार पडल्या. या बैठकांत दोन्ही पक्षांद्वारे 2022 साली होणाऱ्या पालिका निवडणुकीवर चर्चा करण्यात आली.  या बैठकांत शिवसेनेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिल्याची माहिती आहे. तर काँग्रेसनेही निवडणुकीच्या अनुषंगाने डावपेच आखायला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. (nashik municipal corporation election update congress shivsena meeting)

औरंगाबाद, मुंबई तसेच नाशिक शहरातील महापालिका निवडणुकीला मोठं महत्त्व आहे. या तिन्ही शहरांतील महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळ्या रणनीती आखल्या जातात. आपल्या पक्षाचा जनाधार, उमेदवाराच्या जिंकण्याची संभाव्यता या सर्व गोष्टींच धांडोळा पक्षांकडून घेण्यात योतो. या पार्श्वभूमीवर नाशिमध्येही राजकीय हालचालींना वेग आला आहे. शहरात आज दोन पक्षांच्या पादाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या आहेत. दोन्ही पक्षांकडून आपापली ताकद तसेच, मागील निवडणुकीतील अपयशाची मिमांसा या बैठकीत केली गेली.

शिवसेनेकडून स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी

येथील शिवसेना कार्यालयात शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेकूडन स्वबळावर लढण्यासाठीची चाचपणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचबरोबरच मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाची मिमांसा या बैठकीत केली गेली. दरम्यान, आगामी महापालिका निवडणूक स्वबळावरच लढवावी अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मागणीवर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या बैठकीला शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर आदी नेते उपस्थित होते.

काँग्रेसकूडन आढावा बैठक

दरम्यान, शिवसेनेकूडन स्वबाळावर लढण्याची मागणी होत असताना, येथील काँग्रेसच्या प्रादेशिक नेत्यांनीसुद्धा आढावा बैठक घेतली. या बैठकीत 2022 साली होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर साधक-बाधक चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधिंसह स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, राज्यातील सर्व महापालिका स्वबळावर लढवायच्या की महाविकास आघाडी म्हणून भाजपला एकत्रीतपणे सामोरं जायचं यावर आजूनतरी ठोस निर्णय झालेला नाही. मात्र, नाशिकमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या अनुशंगाने महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपापल्या पातळीवर तयारी सुरु केली आहे, हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचे भवितव्य काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठऱणार आहे.

संबंधित बातम्या :

कोल्हापूर महापालिका निवडणूक चंद्रकांत पाटलांचं भवितव्य ठरवणार?

औरंगाबाद, कोल्हापूर ते कल्याण-डोंबिवली, फेब्रुवारीत 5 महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा? 

बाळासाहेबांना अभिवादन करुन भाई जगताप म्हणाले, आमची सर्व जागा लढण्याची तयारी

(nashik municipal corporation election update congress shivsena meeting)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.