NMC Election 2022: 31 नंबर प्रभागातील 2 वार्डात महिलांना संधी, तिसऱ्या वार्डात कोण मारणार बाजी?
शिवाय 2017 च्या निवडणुकीत या प्रभागात 4 वार्ड होते तर यंदा तीनच वार्ड राहणार आहेत. गतनिवडणुकीत चार वार्डामध्ये मोठी रस्सीखेच झाली होती. असे असताना प्रभागातील वार्ड क्रमांक 1 मध्ये दोंदे भगवान सुकदेव हे विजयी झाले होते. तर दोनमध्ये आव्हाड पुष्पा साहेबराव, तीन नंबरमध्ये जाधव संगिता अमोल या विजयी झाल्या होत्या तर चारमध्ये डेमसे सुदाम शंकर यांनी बाजी मारली होती.

नाशिक : दिवसागणिस राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असताना दुसरीकडे (Nashik Corporation) नाशिक महापालिकेच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत झाली आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत अमूलाग्र बदल झाला आहे. (Political situation) राजकीय समीकरणे तर बदलली आहेतच पण आता या वार्डामध्ये फेरचना झाली आहे. त्यामुळे या प्रभागतले काही विभाग दुसऱ्या मतदारसंघात जाऊ शकतात. हा पूर्वीचा मतदारसंघ राहिलेला नाही. सन 2017 च्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि मनसेमध्ये खरी लढत झाली होती. यामध्ये (BJP) भाजपाने बाजी मारली असली तरी गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीचा परिणाम थेट आता वार्डा-वार्डामध्ये पाहवयास मिळणार आहे. महाविकास आघाडीची स्थापना आणि आता नव्याने स्थापित झालेला शिंदे गट. यामुळे प्रशासकीय स्तरावर निवडणुकीची तयारी सुरु असली तरी राजकीय समीकरणे ही त्यावेळेसच स्पष्ट होणार आहेत. 31 नंबर प्रभागातील दोन वार्ड हे सर्वसाधारण महिलेसाठा राखीव आहेत तर तिसरा वार्ड सर्वसाधारणासाठी खुला राहणार आहे.
प्रभाग क्रमांक 31 मधील महत्वाचा भाग
वार्डातील क्षेत्रावर त्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे वार्ड निश्चिती झाल्याशिवाय कोण इच्छूक हे समोर येत नाही. प्रभाग क्रमांक 31 मध्ये यावेळी तीन वार्ड असून पाटील नगर आणि सावता नगर क्षेत्रातील विभागांचा समावेश असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वेय महापालिका प्रशासनाने हद्द निश्चित केली आहे. या प्रभागामध्ये उंटवाडी, पाटील नगर, सावता नगर, सुबाषचंद्र बोस गार्डन, पेठे विद्यालय, जी.एस.टी भवन, त्रिमूर्ती चौक, डॉ. हेडगेवार नगर या भागांचा समावेश असणार आहे. या भागामध्येच अ,ब,क असे वार्ड राहणार आहेत.
प्रभाग 31 चे 2017 मध्ये कसे होते चित्र?
शिवाय 2017 च्या निवडणुकीत या प्रभागात 4 वार्ड होते तर यंदा तीनच वार्ड राहणार आहेत. गतनिवडणुकीत चार वार्डामध्ये मोठी रस्सीखेच झाली होती. असे असताना प्रभागातील वार्ड क्रमांक 1 मध्ये दोंदे भगवान सुकदेव हे विजयी झाले होते. तर दोनमध्ये आव्हाड पुष्पा साहेबराव, तीन नंबरमध्ये जाधव संगिता अमोल या विजयी झाल्या होत्या तर चारमध्ये डेमसे सुदाम शंकर यांनी बाजी मारली होती. यंदा प्रभागात तीनच वार्ड असणार आहे. त्यानुसारच प्रभाग रचना करण्यात आली आहे.
लोकसंख्येचे असे आहे स्वरुप
नाशिक शहराची एकूण लोकसंख्या ही 14 लाख 86 हजार 53 असली मागच्या जनगणेनुसार प्रभाग क्रमांक 31 ची लोकसंख्या ही 30 हजार 414 ऐवढी होती. यामध्ये अनुसूचित जातीचे मतदार हे 1 हजार 860 तर अनुसूचित जमातीचे 1 हजार 319 एवढे मतदार होते. त्यामुळे या प्रभागात देखील सर्वसाधरण मतदार हेच लक्षवेधी ठरणार आहे. प्रशासनाच्या तयारी नंतर आता इच्छूकही चाचपणी करु लागले आहेत.
नाशिक महापालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 31 अ
| पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
|---|---|---|
| भाजप | ||
| शिवसेना | ||
| राष्ट्रवादी | ||
| काँग्रेस | ||
| मनसे | ||
| इतर |
नाशिक महापालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 31 ब
| पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
|---|---|---|
| भाजप | ||
| शिवसेना | ||
| राष्ट्रवादी | ||
| काँग्रेस | ||
| मनसे | ||
| इतर |
नाशिक महापालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 31 क
| पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
|---|---|---|
| भाजप | ||
| शिवसेना | ||
| राष्ट्रवादी | ||
| काँग्रेस | ||
| मनसे | ||
| इतर |
यंदाच्या निवडणुकीत आरक्षणाचे असे चित्र
अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण खुला
