शरद पवारांच्या टोल्यानंतर नवनीत राणा म्हणतात…

"राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात भाजपला पाठिंबा द्यावा," अशी इच्छा खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली (Navneet rana on NCP-BJP alliance) आहे.

शरद पवारांच्या टोल्यानंतर नवनीत राणा म्हणतात...

नागपूर : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात भाजपला पाठिंबा द्यावा आणि राज्यात भाजपचं सरकार यावं,” अशी इच्छा अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली (Navneet rana on NCP-BJP alliance) आहे. “शरद पवारांनी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर आणि शेतकऱ्यांवर संकट आलं आहे. तेव्हा त्यांनी त्यातून शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राला बाहेर काढलं आहे. त्यामुळे शरद पवारांनी भाजपसोबत बसून सत्तास्थापन केली पाहिजे,” असेही त्या (Navneet rana on NCP-BJP alliance) म्हणाल्या.

मी काल झालेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, “शरद पवारांनी भाजपसोबत बसून सत्तास्थापन केली पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण शरद पवारांनी जेव्हा महाराष्ट्रावर आणि शेतकऱ्यांवर संकट आलं आहे. तेव्हा शरद पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला आणि शेतकऱ्यांना बाहेर काढलं आहे.” असे नवनीत राणा टीव्ही 9 मराठीशी बोलताना (Navneet rana on NCP-BJP alliance) म्हणाल्या.

“आजही महाराष्ट्राच्या जनतेवर राष्ट्रपती राजवटीचे फार मोठे संकट आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांवर ओला दुष्काळाचे संकट आहे. त्यामुळ आता सर्वांचे डोळे, सर्वांच्या आशा पवारांवर लागल्या आहेत. त्यामुळे माझी वैयक्तिक इच्छा आहे की पवारांनी भाजपसोबत बसून सत्ता स्थापन केली पाहिजे,” असेही नवनीत राणा म्हणाल्या.

दरम्यान कालही नवनीत राणांनी राष्ट्रवादीने भाजपसोबत एकत्रित येऊन सरकार स्थापन करावे असं म्हटलं होतं. याविषयी पत्रकारांनी काल सोनिया गांधी यांच्या बैठकीनंतर शरद पवारांना विचारले असता शरद पवार म्हणाले. “नवनीत राणा कोण आहेत? त्या आमच्या पार्टीचे धोरण ठरवणार आहेत का?” असे सांगत शरद पवार यांनी नवनीत राणांना टोला लगावला (Navneet rana on NCP-BJP alliance) होता.

शरद पवार- सोनिया गांधी यांची बैठक

दरम्यान, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात काल बैठक झाली. शरद पवार (Sharad Pawar meet Sonia Gandhi) हे सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील 10 जनपथ या निवासस्थानी दाखल झाले होते. तिथे दोघांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधून चर्चेचा तपशील सांगितला.

शरद पवार म्हणाले, “सोनिया गांधी आणि ए के अँटोनी यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली.  महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यातील स्थिती सोनिया गांधी यांना सांगितली. या परिस्थितीवर लक्ष ठेवू, वरिष्ठ नेत्यांचं मत घेऊन पुढील रुपरेषा ठरवू. एवढीच चर्चा झाली”

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI