‘बांगलादेशातून मुली आणून वेश्याव्यवसाय केला, आमच्याकडे Video आहे’ आणखी एक सनसनाटी आरोप

Nawab Malik : नवाब मलिकांवर करण्यात आलेल्या ईडी कारवाईनंतर आता वातावरण चांगलंच तापलंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही या कारवाईविरोधात निषेध आंदोलन केलंय. तपास यंत्रणांना हाताशी धरुन भाजप सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

'बांगलादेशातून मुली आणून वेश्याव्यवसाय केला, आमच्याकडे Video आहे' आणखी एक सनसनाटी आरोप
नवाब मलिकांवर मोहित कंबोज यांचे गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 10:46 AM

मुंबई : भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर सनसनाटी आरोप केले आहेत. ईडीनं अटक केल्यानंतर आता राजकारण एकीकडे ढवळून निघालं आहे. तर दुसरीकडे भाजपच्या मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांवर चक्क वेश्याव्यवसाय करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. नवाब मलिक हे डान्सबार चालवायचे, बांगलादेशातून (Bangladesh) मुली आणायचे आणि वेश्याव्यवसाय करायचे, असा आरोप कंबोज यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे आता आणखीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या सगळ्याप्रकरणी आपल्याकडे पुराव्याखातर व्हिडीओही असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या नवाब मलिक यांना बुधवारी ईडीनं अटक केली होती. त्याआधी सात तास त्यांची चौकशी झाली होती. 3 मार्चपर्यत नवाब मलिक यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच आता मोहित कंबोज यांनी मलिकांवर सनसनाटी आरोप केल्यानं चर्चांना उधाण आलंय.

काय म्हणाले मोहित कंबोज?

मुंबईत मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी नवाब मलिक यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवरही त्यांनी यावेळी निशाणा साधत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नवाब मलिकांवर सनसनाटी आरोप करताना मोहित कंबोज म्हणालेत की,….

तुम्हाला ऐकून धक्का बसेल, कारण राज्यातला एक मंत्री डान्सबार चालवत होता. बांगलादेशातून मुली आणून मुंबईत वैश्याव्यवसाय आणायचं काम नवाब मलिक करत होते. अशा अनेक मुलींचे आम्ही स्टिंग ऑपरेशन केले आहेत. त्याचे व्हिडीओ आहेत आमच्याकडे.. ज्यात मुलींनी कबूल केलंय की नवाब मलिक जबरदस्ती त्यांच्याकडून मुंबईत हे काम करुन घेत होते.

लवकरच मी हे सगळे व्हिडीओ येणाऱ्या काळात तपास यंत्रणांना देणार आहे.. ही दुःखद गोष्ट आहे.. कुर्ल्यात लोक घाबरायचे या गोष्ट बोलायला..

एक मंत्री ड्रग्जमध्ये, एवेश्या व्यवसायात सामील आहे, त्याच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध अससल्याचा आरोप,, बेनामी आणि भ्रष्टाचारी संपत्ती आहे…हे भयंकर आहे.. आजच्या आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.

मलिकांच्या समर्थनात आणि विरोधात राजकारण पेटलं!

नवाब मलिकांवर करण्यात आलेल्या ईडी कारवाईनंतर आता वातावरण चांगलंच तापलंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही या कारवाईविरोधात निषेध आंदोलन केलंय. तपास यंत्रणांना हाताशी धरुन भाजप सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुणे, नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक झालेत. नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपकडून केली जाते आहे. तर दुसरीकडे राजीनामा घेतला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महाविकास आघाडी सरकारनं घेतली आहे. एकूण नवाब मलिकांच्या ईडी कारवाईनंतर राज्यात राजकीय संघर्ष पेटलाय.

पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

Nawab Malik | घरुन उशी-गादी मागवली, ईडीच्या कोठडीत नवाब मलिकांची पहिली रात्र कशी गेली?

Video : जयंत पाटील म्हणतात ‘मी पुन्हा येईन’, सुप्रिया सुळे म्हणतात तसं म्हणू नका नायतर…

नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी, ‘हमारा दौर आयेगा…’ मलिकांचा भाजपला सूचक इशारा!

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.