फडणवीसांकडून रश्मी शुक्लांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कटकारस्थान : नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर रश्मी शुक्ला यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कटकारस्थान रचल्याचा आरोप केलाय.

फडणवीसांकडून रश्मी शुक्लांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कटकारस्थान : नवाब मलिक
Nawab Malik and Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 8:48 PM

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी दिलेला अहवाल नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी तयार केला आणि त्यावर सिताराम कुंटे यांनी सही केली, असा आरोप केला. यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलेय. फडणवीसांचे आरोप चुकीचे असून या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाल्याने जवळचे व्यक्ती अडचणीत येतील म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय (Nawab Malik say Devendra Fadnavis is afraid due to FIR in phone tapping case).

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले, “रश्मी शुक्लांचा अहवाल नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला असे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. मात्र, ते स्वतः रश्मी शुक्लाच्या पत्राचा आधार घेऊन दिल्लीत प्रेस घेऊन सरकारवर आरोप करत होते. मुंबईतही प्रेस घेतली आणि बदल्यांमध्ये पैसे खाल्ले असे आरोप करत होते. केंद्रीय गृहसचिवांना व राज्यपालांनाही ते भेटले.”

‘फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम केलं’

“मुंबईत प्रेस घेऊन फडणवीसांनी सांगितलेला रश्मी शुक्लाचा रिपोर्ट काय आहे? बेकायदेशीर फोन टॅप केले. रश्मी शुक्लाचा रिपोर्ट येईपर्यंत कुठल्याही अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. नंतरच्या काळात काही बदल्या झाल्या असं ते सांगत आहेत. त्यात 12 नावं आहेत. मात्र, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये बदल्या होत राहतात. पोलीस बोर्डाच्या अध्यक्षतेखाली या बदल्या होतात. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम केलंय,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

‘गुन्हा दाखल झाल्यावर फडणवीस का घाबरत आहेत?’

“नवाब मलिक यांनी अहवाल फोडला असे फडणवीस बोलत आहेत परंतु गुन्हा दाखल झाल्यावर का घाबरत आहेत?” असा सवालही नवाब मलिक यांनी केला. चोरी झाली नाही अशी बोंबाबोंब फडणवीस करत आहेत. अफवा पसरवून लोकांना बदनाम करत आहेत. आम्ही सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करत नाही. कारण आमचे सरकार खंबीरपणे उभे आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.

‘रश्मी शुक्ला यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कटकारस्थान’

देवेंद्र फडणवीस हे रश्मी शुक्ला यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कटकारस्थान आखत होते. त्या अहवालात काय आहे? ऑगस्टमध्ये हा अहवाल सादर झाला तेव्हा कुठलीही बदली झालेली नाही. फडणवीसांनी तो 6 जीबीचा डेटा दाखवावा, असं आव्हानच मलिक यांनी फडणवीसांना दिलं आहे. भाजपला सत्तेशिवाय राहता येत नाही. भाजपचे नेते आपल्या जवळच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत कट रचत आहेत. तीन महिन्यात सरकार पडेल, आमदार फुटतील, अशा वल्गना केल्या त्याचं काय झाल? राष्ट्रपती राजवट लागेल अशी बोंबाबोंब करतात, पण तसं काही होणार नाही. सरकारवर लोकांचा विश्वास आहे, असा दावाही मलिकांनी केला आहे.

फडणवीस काय म्हणाले होते?

राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल हा मी फोडला नाही. मी या अहवालाचं केवळ कव्हरिंग लेटर वाचलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तो अहवाल प्रसारमाध्यमांना उपलब्ध करुन दिला. आता हेच नेते अहवाल फुटल्यामुळे काही अधिकाऱ्यांना मानसिक त्रास होत असल्याचे म्हणत आहेत. पण मी कव्हरिंग लेटर वगळता उर्वरित अहवाल लिफाफाबंद करुन केंद्रीय गृहसचिवांना सादर केला होता. याउलट नवाब मलिक यांनी या अहवालाची काही पाने प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे तो अहवाल नवाब मलिक यांनीच फोडला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

हेही वाचा :

‘पुण्याच्या आयुक्तपदी असताना रश्मी शुक्ला बिल्डरांकडून खंडणी गोळा करायच्या’

Phone Tapping: जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिकांनी रिपोर्ट तयार केला असावा, सीताराम कुंटेंनी फक्त सही केली: देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ पाहा :

Nawab Malik say Devendra Fadnavis is afraid due to FIR in phone tapping case

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.