AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : ‘त्याच्या बोलण्यामुळे तो स्वत:च्या पत्नीच्या…’ अजित पवार काय म्हणाले?

Ajit Pawar : "माझ्यापण बॅग तपासल्या. मी परभणीला असताना माझ्या बॅगा तपासल्या. निवडणूक आयोगाला तो अधिकार आहे" असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी त्यांची बॅग तपासली, त्यावरुन संताप व्यक्त केला. यावरुन आता राजकारण सुरु असताना अजित पवारांनी या विषयावर आपली भूमिका मांडली आहे.

Ajit Pawar : 'त्याच्या बोलण्यामुळे तो स्वत:च्या पत्नीच्या...' अजित पवार काय म्हणाले?
Ajit Pawar on Rana
| Updated on: Nov 12, 2024 | 10:56 AM
Share

उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हे यांची बॅग तपासण्यात आली, त्यावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार या विषयावर बोलले आहेत. “माझ्यापण बॅग तपासल्या. मी परभणीला असताना माझ्या बॅगा तपासल्या. निवडणूक आयोगाला तो अधिकार आहे. मागे लोकसभेला मुख्यमंत्र्यांच्या बॅग तपासल्या. विरोधकांनी तक्रार केली, पोलिसांच्या मदतीने या गोष्टी होतात. आमच्याबरोबर पोलिसांच्या गाड्या असताना त्यांच्या गाड्या तपासा आणि आमच्याही गाड्या तपासा” असं अजित पवार बोलले. “मी या निवडणुकीत सोशल इंजिनिअरींग केलं आहे. 12.50 टक्के जागा आदिवासींना, 12.50 टक्के जागा मागासवर्गीयांना, 10 टक्के जागा अल्पसंख्यांकांना आणि 10 टक्के जागा महिलांना दिल्या” असं अजित पवार म्हणाले.

“निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे. जे बोलतो तसं वागतो, निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आम्ही आमची भूमिका मांडू” असं अजित पवार म्हणाले. “राज्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहेच. पण प्रत्येक जागा लढवताना पाच वर्षात काय केलं? पुढच्या पाच वर्षात काय करणारं? हे सांगितलय. बारामतीमधील प्रत्येक गावासाठी जाहीरनामा दिलाय. पाच वर्षात काय केलं? पुढच्या पाचवर्षात काय करणार? हे सांगितलय” असं अजित पवार म्हणाले.

‘लोकांना फार नकारात्मक बोललेलं आवडत नाही’

महायुतीचे घटक असलेल्या रवी राणांच्या वक्तव्यावर सुद्धा अजित पवार बोलले. अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही होत नाही असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं होतं. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रवी राणांना अजित पवारांनी चांगलेच फटकारल्याच पाहायला मिळालं. “ती विनाशकाले विपरित बुद्धी. याबद्दल न बोललेलं बरं. त्याच्या बोलण्यामुळे तो स्वत:च्या पत्नीच्या पराभवाला कारणीभूत ठरला. लोक काहीही बोलत असतात. प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं. लोकांना फार नकारात्मक बोललेलं आवडत नाही. जनता सकारात्मक विचार करत असते. मी पण विधानसभेला दोनदा रवी राणाच समर्थन केल. काय बोलावं हा त्याचा अधिकार आहे. आम्ही चांगल्या मताधिक्क्याने विजयाचा प्रयत्न करणार. मला आनंदराव अडसूळ भेटले. तिथे त्यांच्याविरोधात काम करतोय. हे बरोबर नाही. देवेंद्र फडणवीसांनी त्याला योग्य पद्धतीने समजावलं पाहिजे. महायुतीत कुठेही अंतर पडणार नाही. कारण नसताना गैरसमज निर्माण होणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. वाचाळवीरांनी वाचाळपणा बंद केला पाहिजे” असं अजित पवार म्हणाले.

गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.