मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शरद पवार आणि अजित पवार ‘वर्षा’वर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार वर्षा बंगल्यावर पोहोचले. महत्वाचं म्हणजे शरद पवारांसह उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा वर्षा बंगल्यावर गेले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शरद पवार आणि अजित पवार 'वर्षा'वर
उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार
हेमंत बिर्जे

| Edited By: सचिन पाटील

Jun 07, 2021 | 7:21 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) वर्षा बंगल्यावर पोहोचले. महत्वाचं म्हणजे शरद पवारांसह उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा वर्षा बंगल्यावर पोहोचले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची चर्चा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट महत्त्वाची आहे. याशिवाय महामंडळावरील नियुक्त्यांबाबतही दोघांमध्ये चर्चा होऊ शकते.

शरद पवार हे महाविकास आघाडीचे निर्माते आहेत. शिवाय महाविकास आघाडीचे मार्गदर्शक अशीही त्यांची ओळख आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या भेटीपूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाची चर्चा होणार हे नक्की आहे. राज्य सरकारची व्यूहरचना काय असेल, कोरोनाच्या संकटात आर्थिक चणचण कशी दूर होईल, रखडलेला GST, मराठा आरक्षण अशा सर्व विषयांवर दोघांमध्ये चर्चा होऊ शकते.

महामंडळांबाबत चर्चा होणार? 

दरम्यान, काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आज शरद पवारांची भेट घेतली.  यावेळी त्यांनी पवारांशी राज्यातील महामंडळांवरील नियुक्त्यांसंदर्भात चर्चा केली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असून महामंडळांवरील नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

त्यामुळे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महामंडळावरील नियुक्त्यांबाबतही चर्चा होऊ शकते.

उद्धव ठाकरे मोदींना भेटणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणावर होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मोदी-ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (cm uddhav thackeray will meet pm narendra modi tomorrow) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली असून उद्धव ठाकरे यांना उद्या मंगळवारी भेटीची वेळी दिली आहे.

संबंधित बातम्या  

VIDEO: महामंडळांवरील नियुक्त्या लवकरच जाहीर होणार?; पवार-थोरात भेटीत काय घडलं?, वाचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधानांना भेटणार; मराठा आरक्षणावर होणार चर्चा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें