एकनाथ शिंदेंच्या विनंतीवरून महापौरपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीची माघार

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विनंतीवरुन राष्ट्रवादीने ठाणे महापालिका महापौर पदाच्या शर्यतीतून माघार घेतली.

एकनाथ शिंदेंच्या विनंतीवरून महापौरपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीची माघार
दहा तासांच्या प्रतिक्षेनंतर एकनाथ शिंदे जळगाव महापालिकेत आले; मात्र नगरसेवकांच्या पदरी निराशाच
Follow us
| Updated on: Nov 17, 2019 | 11:35 AM

ठाणे : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विनंतीवरुन राष्ट्रवादीने ठाणे महापालिका महापौर पदाच्या शर्यतीतून माघार घेतली (Thane Municipal Corporation Mayor Elections). त्यामुळे आता ठाणे महापालिका महापौर आणि उपमहापौरपदावर शिवसेनेची पकड असणार आहे (Shivsena Mayor).

ठाणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी शनिवारी (16 नोव्हेंबर) अर्ज दखल करण्यात आले (Thane Municipal Corporation Elections). महापौर पदासाठी ठाणे महापालिकेचे सभागृह नेते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी अर्ज दाखल केला. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी कदम (Pallavi Kadam) यांनी अर्ज दाखल केला. महापौर आणि उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवकही अर्ज दाखल करणार होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या विनंतीनंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत माघार घेतली. त्यामुळे नरेश म्हस्के यांची महापौरपदी तर पल्लवी कदम यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. येत्या 21 नोव्हेंबरला त्यांच्या निवडीची घोषणा केली जाणार आहे.

राज्यात महासेनाआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असताना ठाणे महापालिकेतही महासेनाआघाडीचे दर्शन घडले. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या उपास्थितीत महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षाच्या कार्यालयात जाऊन विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. पालिका मुख्यालयात येऊन एकनाथ शिंदे कधीच विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात गेले नसून पहिल्यांदाच ते या कार्यालयात गेले असल्याने राज्याप्रमाणे ठाणे महापालिकेतही महासेनाआघाडीचे चित्र पाहायला मिळाले.

उपमहापौरपदावरुन ठाणे महापालिकेत अंधविश्वास

ठाणे महापालिकेच्या महापौरपदापेक्षा उपमहापौर पदावरून पालिकेत गोंधळाचे वातावरण आहे. ठाणे महापालिकेत उपमहापौर हे पद अशुभ मानले जात असल्याने हे पद कोणीही घेण्यास इच्छुक नसल्याचे या निवडणुकीत दिसून आलं. या पदासाठी शिवसेनेचे नगरसेवक उमेश पाटील आणि सुधीर कोकाटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, हे उपमहापौरपद घेण्यास दोन्ही नगरसेवकांनी नकार दिल्याने हे पद नगरसेविका पल्लवी कदम यांना देण्यात आलं.

यापूर्वी ज्यांनीही ठाणे महापालिकेचं उपमहापौरपद भूषवलं, त्या नगरसेवकांची राजकीय कारकीर्द संपली किंवा ते पुन्हा कधीही निवडून आलेले नाहीत, असा इतिहास असल्याने उपमहापौरपद घेण्यावरून सर्वच नगरसेवकांमध्ये कमालीची भीती आहे. तर याबाबत उपमहापौरपद हे शापित नसल्याचे सेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

ठाणे महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकल्यास नरेश मणेरा 1988 साली उपमहापौरपद भूषवले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी दोनवेळा निवडणूक लढवलीच नाही. त्यानंतर निवडणूक लढवून ते सध्या शिवसेनेचे नगरसेवक आहेत. 1991 साली काँग्रेसच्या तिकिटावर नईम खान जिंकल्यावर त्यांना उपमहापौरपद देण्यात आले. 1992 मध्ये नईम खान त्यांना महापौरपद देण्यात आले. परंतु, त्यानंतर काँग्रेसची सत्ताच आली नाही आणि नईम खान यांची राजकीय कारकीर्दही संपली. 1993 साली शिवसेनेच्या मालती भोईर या उपमहापौर झाल्या, मात्र त्यांची राजकीय कारकीर्द देखील संपुष्टात आली. 2005 पर्यंत मालती भोईर, सुलभा ओक, प्रतिभा पाटील, कमल वाघ, दत्तात्रय कामत, भालचंद्र पाटील, हरिश्चंद्र येलभर, दिवंगत मेघनाथ म्हात्रे आणि सुभाष काळे या सर्वांच्या राजकीय कारकीर्द संपुष्टात आल्या. तर माजी महापौर अशोक वैती, मिलींद पाटणकर आणि मुकेश मोकाशी या तिघांचे अपवाद वगळता माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, मनोज लासे, गणेश साळवी यांना देखील पालिका निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले असल्याने हे पद नको अशी सर्वच नगरसेवकांची भावना झाली आहे.

राष्ट्रवादीतून आलेल्या देवराम भोईर यांना डावललं, नरेश म्हस्केचं महापौर

ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी खुल्या वर्गाचे आरक्षण पडल्यानंतर अनेकजण महापौर पदासाठी उत्सुक होते. यामध्ये सुरुवातीपासूनच नरेश म्हस्के यांचे नाव आघाडीवर होते. राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेल्या देवराम भोईर यांना देखील महापौरपदाचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळे ते देखील या पदासाठी उत्सुक होते. मात्र, शनिवारी केवळ नरेश म्हस्के यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने म्हस्के यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे देवराम भोईर हे नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, नरेश म्हस्के यांच्या रूपाने पहिल्यांदाच ठाणे पूर्व भागाला महापौरपदाची संधी मिळाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हस्के यांना संधी न देण्यात आल्याने त्यांना महापौर पद देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

नरेश म्हस्के यांची राजकीय कारकीर्द

नरेश म्हस्के हे गेले चार टर्म नगरसेवक असून दोन वेळा ते स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात बसले तर दोन वेळा ते निवडून आले आहेत. पक्षांच्या बांधणीपासून ते शिवसेनेत आहेत. भारतीय विद्यार्थी सेनेपासून ते नगरसेवक, जिल्हाप्रमुख, सभागृह नेते आणि महापौर असा त्यांचा प्रवास आहे. सभागृहात पक्षाची बाजू भक्कमपणे मांडणारे नेते म्हणून देखील त्यांची ओळख आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.