राष्ट्रवादीला माढ्याचा तिढा सुटेना, अकलूजमध्ये मोहिते-पाटलांची बैठक

राष्ट्रवादीला माढ्याचा तिढा सुटेना, अकलूजमध्ये मोहिते-पाटलांची बैठक

सोलापूर/मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खदखद सुरु आहे. माढ्यातील तिढा अद्याप राष्ट्रवादीला सुटेना अशी परिस्थिती आहे. माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार यांनी ही जागा लढवण्याची विनंती केली होती. त्यानंतर पवारांनीही आधी निवडणूक लढण्याची घोषणा केली, मात्र नंतर पार्थ पवार यांना मावळची उमेदवारी जाहीर करताना, एकाच घरात तीन तीन उमेदवार नको म्हणून, स्वत:ची उमेदवारी मागे घेतली.

तेव्हापासून माढ्याचा तिढा आहे. माढ्याच्या उमेदवारीवरुन विजयसिंह मोहिते पाटलांनी बैठक बोलावली आहे. ही बैठक विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अकलूज इथल्या शिवरत्न बंगल्यावर होत आहे. पवारांच्या माघारीनंतर उमेदवारी कोणाला द्यायची, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.  दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे.

सुप्रिया सुळेंकडून फॅमिली फोटो शेअर, पवार कुटुंबात सर्वकाही आलबेल?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रातील 15 उमेदवार राष्ट्रवादीने जाहीर केले आहेत. पहिल्या यादीत 10 तर दुसऱ्या यादीत 5 उमेदवार घोषित केले. पण माढा, उस्मानाबाद आणि अहमदनगर या महत्त्वाच्या जागांची घोषणा राष्ट्रवादीने अद्याप केलेली नाही. या जागांवरुन राष्ट्रवादीत घासाघीस सुरु आहे. त्यामुळेच या जागांची घोषणा राखून ठेवली आहे.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

लोकसभा निवडणूक : तुमच्यासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

संबंधित बातम्या

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, पार्थ पवार, अमोल कोल्हेंना उमेदवारी

इंदापुरात दगाफटक्याची भीती, सुप्रिया सुळेंची हर्षवर्धन पाटलांसोबत बैठक

फडणवीसांची विधाने बालबुद्धीला शोभणारी: पवारांचा हल्ला  

पवारांच्या मनात द्वेष, राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील   

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर  

आता पवारांना तेवढं भाजपमध्ये घेऊ नका: उद्धव ठाकरे   

पुण्यातून गिरीश बापटांना उमेदवारी जवळपास निश्चित! 

Published On - 9:29 am, Tue, 19 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI